13 January, 2021

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी कामगारांना सुट्टी देण्याचे आवाहन

 

 

हिंगोली,दि.13(जिमाका): स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत) सार्वत्रिक निवडणूक 2020-21 या पदासाठी निवडणूक दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. या निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील विविध दुकाने, आस्थपना, निवासी हॉटेल, व्यापार, औद्यौगिक उपक्रम व इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा अपवादात्मक अत्यावश्यक सेवेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या पूर्व परवानगीने दोन तासांची सवलत देण्यात यावी, याची सर्व आस्थापना मालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

****

No comments: