22 January, 2021

राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

 


            हिंगोली,(जिमाका) दि. 22 : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात आणि जिल्ह्यातील सर्व मदान केंद्राच्या ठिकाणी 25 जानेवारी, 2021 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम 25 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 09:30 वाजता शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथे आयोजीत करण्यात आला आहे.   

            भारत निवडणूक आयोगाच्या दि20 जानेवारी, 2021 च्या पत्रान्वये यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसापासुन भारत निवडणूक आयोगाने मतदारांना सहज आणि सोप्या पध्दीतीने ई-छायाचित्र मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करुन घेण्यासाठी https://nvsp.in/, https://voterportal.eci.gov.in/ या वेबपोर्टलव्दारे तसेच Voter Helpline Mobile App (Android & iOS) या ॲपव्दारे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            दि. 01 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या कार्यक्रमात नव्याने मतदार म्हणुन नोंदणी झालेल्या नवमतदारांना सदर सुविधा दि. 25 जानेवारी, 2021 ते दि. 31 जानेवारी, 2021 या कालावधीत वापरता येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने https://kyc.eci.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली Ekyc पुर्ण करुन दि. 01 फेब्रुवारी, 2021 पासुन सर्व मतदारांना उक्त वेबपोर्टल व ॲपव्दारे e-EPIC डाऊनलोड करता  येणार आहे. सदर e-EPIC प्रिंट करुन मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणुन वापरता येणार आहे.

            त्या अनुषंगाने e-EPIC सुविधेचा वापर करुन छायाचित्रमतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. EPIC डाऊनलोड करताना काही अडचण आल्यास भारत निवडणूक अयोगाचे नोडल अधिकारी श्री. पुनेत ग्रोवेर मो. नं. 9953670300 व श्रीमती विना त्यागी मो. नं. 9867088248 यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणविरकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

****

 

 

No comments: