12 January, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मौजे. सारंगवाडी (शिरडशहापुर) येथील यात्रा कार्यक्रम रद्द

 


       हिंगोली,दि.12 (जिमाका): राज्य शासनाने करोना विषाणुचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांच्या कायक्षेत्रात (कोव्हीड-19) नियंत्रणात आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणुन घोषीत करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षीत अंतर रहावे म्हणुन गर्दी, यात्रा, मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याता आले आहे.

      हिंगोली जिल्हयातील औढा नागनाथ तालुक्यातील मौजे. सारंगवाडी (शिरडशहापुर) या ठिकाणी धार्मिक सण मकरसंक्राती निमीत्याने भाजी कार्यक्रम यात्रा दि. 16 जानेवारी, 2021 रोजी भरणार असुन त्या ठिकाणी लाखो भाविक दर्शन करण्यासाठी व भाजीचा अस्वाद घेण्यासाठी दरवर्षी येतात. त्यामुळे यावर्षी सदर ठिकाणी लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. कोरोना आजारावर अद्याप पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय नसल्याने मौजे. सारंगवाडी (शिरडशहापुर) या ठिकाणी यात्रेस जमणा-या व्यक्तींना /भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत आवश्यक आसल्याने तसेच हिंगोली जिल्हयात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होवू नये, जिवित हाणी होवू नये या दृष्टिने सुरक्षीततेची उपाययोजना म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये मौजे सारंगवाडी (शिरडशहापुर) ता.औंढा नागनाथ या ठिकाणी धार्मिक सण मकरसंक्रात निमीत्त साजरी करण्यात येणारी दि. 16 जानेवारी 2021 रोजीच्या भाजीचा कार्यक्रमाची यात्रा रद्द  करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

 

 

No comments: