21 January, 2021

मुद्रांक शुल्क थकबाकीदारांना थकीत रक्कम जमा करण्याचे आवाहन -- सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील

  हिंगोली, दि.21 (जिमाका):  मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीत महालेखापाल नागपूर यांनी दूय्यम निबंधक कार्यालयाच्या केलेल्या तपासणीत मालमत्तेचे मूल्य कमी दाखवून मुद्रांक शुल्क कमी भरलेल्या 8 थकबाकीदारांची नांवे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील यांनी जाहिर केली आहे. सदर  थकबाकीदारांकडून थकीत मुद्रांक शुल्काची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

मालमत्ता खरेदीच्या दस्त नोंदणीमध्ये मालमत्तेचे मुल्यांकन कमी दाखवून मुद्रांक शुल्कापोटी कमी रक्कमेचा भरणा करणाऱ्याकडून थकीत  मुद्रांक शुल्काची रक्कम वसुल करण्याची कार्यवाही सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. मालमत्तेचे मुल्यांकन कमी दाखवून मुद्रांक शुल्कापोटी कमी रक्कमेचा भरणाऱ्या मध्ये शैलेश रमेशलाल ओस्वाल, विनायक श्रीराम भिसे  आणि संतोष श्रीराम भिसे, सर्व राहणार हिंगोली यांच्याकडे रु. 1 लाख 76 हजार 25 थकबाकीची रक्क्म आहे. तर श्रीराम नारायण कानबाळे आणि संतोष श्रीराम भिसे, सर्व राहणार हिंगोली - रु. 49 हजार 360,  श्रीनिवास द्वारकादास मुदंडा व श्रीमती पुष्पाताई भ्र गणेशलाल जैस्वाल, सर्व राहणार हिंगोली - रु. 3 लाख 40 हजार 725, मोहम्मद उमर अब्दूल गनी आणि सय्यद युनुस सय्यद मन्सूर, सर्व राहणार हिंगोली - रु. 73 हजार 740, लक्ष्मीकांत जयकिशनजी लड्डा, राहणार मोर्शी रोड, अमरावती - रु. 2 लाख 8 हजार 20, तुकाराम सिताराम शिंदे, नारायण शंकरराव बुद्रक आणि विलास लक्ष्मणअप्पा गोठरे सर्व राहणार हिंगोली रु. 74 हजार 700, सतीष सोपानराव येरनाळे राहणार विराळ, ता. जळकोट, जि. लातूर- रु. 3 लाख 39 हजार 840 आणि प्रविण मांगीलालजी भंडारी (मे. महेश असो. गंगाखेड)- रु. 3 लाख 39 हजार 840 थकीत रक्कम भरलेली नाही. याकरीता या थकबाकीदारांनी रक्कमा भरणा करण्यासंदर्भात वेळोवळी नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर थकबाकीदारांनी थकीत असलेली रक्कम (दंडासह) पंधरा दिवसात जमा करावी, अन्यथा महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 46 नुसार संबंधित थकबाकीदाराच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा जाहिर लिलावाद्वारे विक्री करुन सदर रक्कम वसूल करण्यात येईल.

****

No comments: