*
भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे दिले निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाशिवरात्रीनिमित्त
येत्या 15 फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे 8 वे ज्योतिर्लिंग
श्रीक्षेत्र औंढा नागनाथची यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या
अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक
गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने,
औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, वैद्यकीय
अधिकारी डॉ. बालाजी भाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाशिवरात्री यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक
त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
यांनी दिले. यात्रेदरम्यान पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालये, रुग्णवाहिका, आरोग्य पथके, निवास व्यवस्था,
अग्निशमन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनासाठी स्क्रिनिंग व्यवस्था तसेच रस्त्यावरील
खड्डे बुजविणे आदी बाबींचा समावेश असलेला मंदिर सुरक्षा आराखडा तयार करण्याच्या सूचना
त्यांनी केल्या.
यात्रेच्या कालावधीत भाविकांची कोणतीही
गैरसोय होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी
श्री. गुप्ता यांनी बैठकीत स्पष्ट केले.
******
No comments:
Post a Comment