15 November, 2016

इसापूर प्रकल्पातून पाण्याचे पाच आवर्तने सोडण्यात येणार
हिंगोली, दि.15: उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत इसापूर उजवा मुख्य कालवा कि. मी. 119 व इसापूर डावा कालवा कि. मी. 84 पर्यंतच्या वितरण व्यवस्थेंतर्गतच्या लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांसाठी सिंचन वर्ष 2016-17 उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बी हंगामात दोन आवर्तने माहे डिसेंबर 2016 व माहे जानेवारी 2017 या कालावधीत व उन्हाळी हंगामात 3 आवर्तने मार्च ते जून 2017 दरम्यान लाभधारकांच्या मागणीनुसार देण्याच्या नियोजनास दि. 09 नोव्हेंबर, 2016 रोजी मा. जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने करून पाण्याचे आवर्तने लक्षात घेवून त्यानुसार लाभक्षेत्रात पिके घेण्यांचे नियोजन करावे व त्यानुसार सिंचन क्षेत्राची मागणी करून नियमानुसार पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात भरून आपणाकडील देय पाणी पट्टी भरावी व संबंधीत विभागास सहकार्य करावे, असे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 01 चे उपकार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

No comments: