जिल्हाधिकारी कार्यालयात
इंदिरा गांधी जयंती
व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ 
हिंगोली, दि. 19
: - इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी इंदिरा गांधी यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्तची
शपथही सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना देण्यात आली. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा
नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील आदी विविध विभागाचे
अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. 
                                                            ****  


 
No comments:
Post a Comment