08 November, 2016

मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्हा ट्रॉमा टीमचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
हिंगोली, दि.08:  महिलावरील बलात्कार, बालकावरील लैगिक अत्याचार आणि ऍ़सिड हल्ला या मध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थ सहाय्य व पुर्नवसन करण्यासाठी मनोधैर्य योजना सुरु केली असुन जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा क्षती सहाय्य व पुर्नवसन मंडळ गठित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पिडितांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ट्रॉमा टिमचे गठन करण्यात आले आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणुन जिल्हाधिकारी अनिल भंडारी  याची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी हे होते. तसेच यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्य संस्कार प्रबोधिनी औरंगाबादचे चंद्रकांत सोनावणे व राज्य महिला आयोग, नांदेडचे जिल्हा समन्वयक डोम्पले माधव संभाजीराव यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. भंडारी म्हणाले की पोलिसांनी निष्पक्षपणे व अतिशय संवेदशीलपणे प्रकरणांचा तपास करून समाजामध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसावी असे सांगितले. तसेच प्रमुख मार्गदर्शकांनी मनोधैर्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता जिल्हा ट्रॉमा टिमच्या सदस्यांनी सांघीक प्रयत्न करून पिडीतेना न्याय द्यावा.
            सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील श्री. संदीप जाधव, (परीवीक्षा अधिकारी), श्री. यु.एल. शिंदे (विधी सल्लागार), श्रीमती माया सुर्यवंशी (संरक्षण अधिकारी), पांडुरंग खडींग, (लिपीक), नितीश मकासरे, जे.आर. राठोड, गजानन घुगे, राजेश पांडे (सर्व कनिष्ठ सरंक्षण अधिकारी),  एस.एस. साबळे, गंगाधर शेळके, जी.आर. कदम, अमोल बगाटे, शिला रणविर (सर्व सहाय्यक संरक्षण अधिकारी), के.पी. खैरे, रफिक जिलानी शेख, अविनाश पहाडे, प्रवेश सावळे, राहुल जाधव (डाटा एंट्री ऑपरेटर) यांनी प्रयत्न केले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. नितीश मकासरे यांनी केले.  
यावेळी वैद्यकीय विभाग , पोलिस विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी / अधिकारी,  पाचही तालुक्याचे संरक्षण अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कैलास तिडके (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, हिंगोली) यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. यु.एल. शिंदे (विधी सल्लागार, हिंगोली) यांनी केले.

*****

No comments: