16 November, 2016

भारत सरकार शिष्यवृत्तीचे शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क तसेच इतर शैक्षणिक योजनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 16 :  सन 2016-2017 करिता भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क तसेच इतर शैक्षणिक योजनांचे ऑनलाईन अर्ज भरणे बाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी जिल्हयातील सर्व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर, 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
कारण सन 2015-2016 मध्ये हिंगोली जिल्हयातील 148 महाविद्यालयामधून 10,817 अर्ज भरण्यात आले होते. परंतु सन 2016-2017 मध्ये आज पर्यंत 138 महाविद्यालयात 6,641 एवढेच अर्ज भरण्यात आले असल्याचे ऑनलाईन दिसून येत आहे. त्यामुळे सन 2015-2016 च्या तुलनेत अंदाजे उर्वरित 4,176 अर्ज ऑनलाईन कमी दिसत आहेत. तसेच इयत्ता 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण (टक्केवारी) घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या 11 व 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, वि.जा.भ.ज. व वि.मा.प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरावेत आणि नियमानुसार पात्र असणाऱ्या व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील अनुसूचित जाती, वि.जा.भ.ज. व वि.मा.प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विद्यावेतन या योजनेचे सुध्दा ऑनलाईन अर्ज भरावेत. भविष्यात विद्यार्थी / महाविद्यालयाने पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज विहित कालावधीमध्ये ऑनलाईन न भरल्यामुळे कोणतीही अडचणी उध्दवल्यास त्या बाबत समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार नाही, याची गांभीर्याने  नोंद घ्यावी. 
तसेच उपरोक्त योजनांकरिता पात्र असूनसुध्दा ऑनलाईन अर्ज न भरल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांस सदर योजनेचा लाभ न मिळाल्यास त्या करिता संबंधित विद्यार्थी व्यक्तीश: जबाबदार राहिल तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, याची जिल्हयातील मागासवर्गीय विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर बाबीची गांर्भीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांनी केले आहे.

                                                                                *****  

No comments: