29 August, 2017

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘ संवादपर्व  उपक्रमातंर्गत

युवा पिढीने स्वयंरोजगाराच्या माध्यमातून
उद्योजक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत
                                                            --- पी.एस.खंदारे
        हिंगोली, दि.29:- वाढत्या बेरोजगारीचा विचार करता त्यामानाने आज रोजगार उपलब्ध होत नाहीत. त्याकरीता  आजच्या युवा पिढीने नौकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी पी.एस. खंदारे यांनी केले.
             माहिती व जनसंपर्क महासंचालनालय जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाने गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देवून जनजागृती करण्याकरीता ‘संवाद पर्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने कळमनुरी येथील यश स्किल डेव्हलपमेंट यांच्या गणेश मंडळात ‘संवाद पर्व’ उपक्रमाचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि तहसिल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. नायब तहसिलदार श्री. पाचपूते, रोकडेश्वर पाचपूते, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी श्री. खंदारे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अंतर्गत रोजगार व प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध व्यवसायावर अधारित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच युवक-युवतींनी त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणावर अधारीत स्वयंरोजगार सुरु करण्याची गरज आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान यासह विविध योजनाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादीतमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. यात राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्के असून राष्ट्रीयकृत बँकांनी प्रकल्प रक्कमेचा 35 टक्के रक्कम महामंडळामार्फत बीज भांडवलावर म्हणुन देण्यात येते. तसेच प्रधानमंत्री मुद्रा बँक योजने अंतर्गत विनातारण 10 हजार ते 10 लाखापर्यंत स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी  कर्ज उपलब्ध होते, अशी माहिती यावेळी दिली. 
            तसेच नायब तहसिलदार श्री. पाचपूते यांनी महसूल विभागामार्फत देण्यात येणारे ऑनलाईन विविध प्रमाणपत्रासाठी कशाप्रकारे अर्ज करावेत याबाबत सविस्तर माहिती दिली.  
            यावेळी बेटी बचाओ- बेटी पढाओ,  स्वच्छ महाराष्ट्र अभियान यासह विविध योजनाची माहिती दिली.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी ‘संवाद पर्व’ कार्यक्रम आयोजनचा उद्देश उपस्थिताना समजावून सांगितला. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती कोणकोणत्या संकेतस्थळावर मिळू शकते, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे लोकराज्य, महान्यूज, दिलखुल्लास, जय महाराष्ट्र उपक्रमाची माहिती दिली.
            यावेळी वीरशैव गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, बसवेश्वर गणेश मंडळ, मुरलीधर गणेश मंडळ यांचे पदाधिकारी यांच्यासह  मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिकांची उपस्थिती होती.   

****
  

No comments: