28 August, 2017

राष्ट्रीय युवा नेता कार्यमांतर्गत  तालुका  जिल्हास्तरीय
आदर्श युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 28:-  भारत सरकारच्या युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालया अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरु युवा केंद्र, हिंगोली  कार्यालया द्वारा जिल्हयातील नोंदणीकृत युवा/महिला मंडळांकडून राष्ट्रीय युवा नेता कार्यक्रमांतर्गत तालुका जिल्हास्तरीय आदर्श युवा मंडळ पुरस्कार सन 2015-16 आणि  2016-17 अशा दोन वर्षासाठी तालुका आण जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
            तालुकास्तरीय पुरस्काराचे स्वरुप प्रथम- रु 8000/- (रुपये आठ हजार) प्रमाणपत्र द्वितीय- रु 4000/- (चार हजार रुपये) प्रमाणपत्र असे आहे. तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त मंडळाचा प्रस्ताव जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरुप रु.25000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) प्रमाणपत्र असे आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या युवा मंडळाचा प्रस्तावाचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  पात्र ठरणार आहे.
अर्ज करण्यास पात्र असणारे मंडळ/संस्थामधील युवक मंडळाच्या/संस्थेच्या कार्यकारी सदस्यांचे वय 18 ते 29 दरम्यान असावे, युवक मंडळ/संस्था नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालयाशी संलग्न असावी. त्याचबरोबर स्थानीय युवकांच्या माध्यमातून गावाचा विकास, युवा मंडळाचा माध्यमातून कमीत कमी बारा कार्यक्रम असावेत 150 सदस्यांमार्फत एका वर्षामध्ये किमान 100 तास श्रमदान केलेले असावे.

 तरी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरणरक्षण राष्ट्रीय अशा विविध विकासात्मक कार्यक्रम राबविणाऱ्या युवा/महिला मंडळानी आपला विहीत नमुन्यातील अर्ज, अहवाल दि.05/09/2017 पर्यंत नेहरु युवा केंद्र, हिंगोली कार्यालय दिपकज्योती एजन्सीच्या वर, 2 रा मजला, रेल्वे स्टेशन रोड, हिंगोली  येथे सादर करावेत.                                                                     **** 

No comments: