05 January, 2018

जिल्ह्यात कलम 144 लागू



वृत्त क्र.09
जिल्ह्यात कलम 144  लागू
हिंगोली, दि. 5 : जिल्ह्यात पोलीस पाटील पदभरती परीक्षा 2017, रविवार, दि. 7 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.30 या वेळेत 14 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी 14 उपकेंद्रावर 3 हजार 215 उमेदवार परीक्षा देणार  आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या द्दष्टीकोणातून परीक्षा केंद्रावरील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 संबंधित  परीक्षा उपकेंद्रावर लागू करण्यात आले आहे.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती  व परिसर  यामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही  व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही , तसेच या उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन , झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रात  डिजीटल डायरी , मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यात बंदी असेल,  तसेच या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांस नोटीस बजावून त्यांचे म्हणणे  ऐकून  घेण्यास पुरेसा अवधी  नसल्याने  आणीबाणीचे  प्रसंगी फौजदारी संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश  निर्गमित करण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी , हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे .
000000



No comments: