16 January, 2018

लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा उपसा करण्यास प्रतिबंध
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू
            हिंगोली,दि.16: जिल्ह्यात पाणी आरक्षण सभा संपन्न झाली असून जिल्ह्यात उपलब्ध पाण्याची सद्यस्थिती बाबत सन 2017-18 या वर्षात दि. 31 ऑक्टोबर, 2017 अखेर 73.18 मि. मि. पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. सदर टक्केवारी ही वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प प्रमाणात आहे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याच्या अंदाज घेतला असता भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सिंचन तलाव, पाझर तलाव आणि गाव तलाव या पाणी साठ्यातून अवैध पाणी उपसा करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंध करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात दि. 18 डिसेंबर, 2017 रोजी पर्यंत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य वापराकरिता पाणी साठ्याचा उपसा करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये लघु व मध्यम प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजना करिता कुठल्याही प्रकारचे माध्यमाव्दारे पाणीसाठ्याचा उपसा करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे.
             

*****

No comments: