06 January, 2018

क्रॉप सॅप प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन



वृत्त क्र.13                                     
क्रॉप सॅप प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हिंगोली, दि.6: हिंगोली जिल्ह्यात क्रॉपसॅप प्रकल्पातंर्गत कापूस, तूर, हरभरा पिकाचे मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण करण्यात येत असून कापूस पिकाचे क्षेत्र 54 हजार 605, तुरीचे क्षेत्र 38 हजार 124, हरभरा क्षेत्र 66 हजार 485 हे. क्षेत्रावर पेरणी झाली असून कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीमुळे नोव्हेंबर मध्ये  केलेल्या सर्वेक्षणातून 84 गावांमध्ये आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे.भविष्यात शेंदरी बोंडअळींचा उद्रेक रोखण्यासाठी फरदड घेणे कटाक्षाने टाळावे व शेंद्रीय बोंड अळीचे नियंत्रण करण्याकरीता एकात्मिकउपाययोजनाचावापरकरावा.
गुलाबी बोंडअळी फक्त कापूस पिकावर जगत असून उशिरा येणारी किड आहे. ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात त्यांचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो,अतिनुकसान करणारी शेंदरी बोंड अळी हिरव्या बोंडाच्या आत सुरक्षित असल्यामुळे त्यावर रासायनिक फवारणीचा कमी परिणाम होतो,डिसेंबर महिन्यानंतर 4 ते 6 महिने कापूस विरहित शेत ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्टात येतेव त्यामुळे पुढील हंगामामध्ये प्रादुर्भाव व नुकसान कमी होण्यास मदत मिळते,शेंदरी बोंड अळी ही डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते पण फरदडीमुळे तिचा जीवनक्रम चालू राहतो,हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी सोडावे तसेच किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकाची फेरपालट करावी,पिक संपूष्टात आल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाट्याव्यवस्थित न उघडलेले बोंडे आणि इतर पालापाचोळा याचा वापर शेताबाहेर कंपोष्ट तयार करण्यासाठी करावा व शेत स्वच्छ ठेवावे,पऱ्हाटया आणि कपाशीचे इतर अवशेष यांची शेतात बांधावर साठवण करु नये,सद्य परिस्थितीमध्ये तुरीवर घाटेअळीचे  पतंग आढळून येत आहेत. तसेच अंधारी रात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणावर अंडे देऊ शकतात,या किडीमुळे तुर पिकाचे 60 ते 80 टक्के नुकसान होते. तुरीवरील मोठया अळया वरचेवर वेचून त्याचा नायनाट करावा,प्रादुर्भाव ETL च्या वर आढळून आल्यास क्विनॉलफॉस 25 EC ,28 ml ,  सायलोथ्रीन 5EC 10 ml किंवा इमामेक्टोन बेंझोएट 5 SG  4.5 ग्रॅम पाण्यातून फवारावे.
तसेच हरभरा पिकावरील उंट अळी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनच्या माध्यमातून निंबोळी अर्क 5 % किंवा ॲझरडीक्टीन 300 ml किंवा इमामेक्टीन  बेंझाईट 5 SG 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास उंटअळी आणि घाटेअळीवर नियंत्रण मिळू शकते. हरभरा पिकामधील मर रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत, तसेच हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे लावावेत व उत्पादनात वाढ करावी, असे आवाहान उपविभागीय कृषि अधिकारी,  हिंगोली तसेच प्रकल्पाचे किडनियंत्रक के.एच. बोथीकर व एम.पी. खंदारे यांनी केले आहे.
0000000

No comments: