06 January, 2018

जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा



वृत्त क्र.14   

जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा
            हिंगोली,दि.06: मराठी पत्रकारीता सृष्टीचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी,1832 रोजी सुरु केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वर्तमानपत्राचे संस्मरण व्हावे यासाठी दरवर्षी हा दिवस दर्पण दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.
            यानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील, डॉ. निलावार, कन्हैया खंडेलवाल, बालाजी पाठक, श्रीमती शांताबाई मोरे, एहसानखान पठाण, संभाजी कऱ्हाळे, अनिस अहमद, विलास जोशी, नंदकिशोर कांबळे, चंद्रकांत वैद्य,शाम शेवाळकर ,  सलीम पठाण,  अ. हफीज कादर, सुभाष अपूर्वा, नागरे पाटील, श्रीमती आशा बंडगर, अनिल चव्हाण, अशोक बोर्डे यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0000

No comments: