04 May, 2019

पाणी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण व समन्वयासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना


पाणी टंचाई परिस्थितीवर नियंत्रण व समन्वयासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना
हिंगोली, दि.4: महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन परिपत्रक दिनांक 26 ऑक्टोबर 2018 मध्ये निर्देशित केल्यानुसार
पाणी टंचाई  निवारण संदर्भात उपाय योजना करण्यासाठी व पाणी टंचाई  निवारण तक्रारी बाबत वस्तुस्थिती विचारात घेऊन अशा तक्रारींना वाव मिळू नये, यासाठी जिल्हा स्तरावर  उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी यांची नियुक्ती करुन पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीकोणातून नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर पाणी टंचाई नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 02456-221450 व टोल फ्री क्र. 02456-221077 असा असून जिल्ह्यातील पिण्याच्या पाणी टंचाई बाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी उपरोक्त क्रमांकावर आपल्या तक्रारी  नोंदवाव्यात. तक्रारींची दखल घेऊन तात्काळ नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हास्तर प्रशासनाच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे.
****

No comments: