09 May, 2019

खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन


खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके
खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि.9: खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करण्याची लगबग सुरु असते. परंतू बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक खरेदी करावी.
खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य द्या, बनावट भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशक  खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्या पावतीसह खरेदी करा, पावतीनंतर शेतकऱ्यांची व विक्रेत्यांची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन घ्या. पिक निघेपर्यंत पावती सांभाळून ठेवा. खरेदी केलेल्या बियाणेचे वेस्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवा. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याची पाकीटे सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी  पॉकीटावरची अंतिम मुदत पाहून घ्या, कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा, किटकनाशके अंतिक मुदतीचे आतील असल्याची खात्री करा, आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दूरध्वनी, ई-मेल, एमएमएस इत्यादीद्वारे देऊन शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा, कृ्षि निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनासाठी कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा, शेतकऱ्यांनी बियाणे व उगवल्याची लेखी तक्रार तात्काळ  संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयास कळवावे, शेतकऱ्यांच्या या संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर 01 व तालुका स्तरावर 05 अशा  एकूण 6 तक्रार निवारण  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक कृषि निविष्ठा विक्री केंद्रावर भरारी  पथकाचे फोन नंबर दिलेले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे, कृषि विकास अधिकारी ए. आर. डुबल यांनी केले आहे.
****

No comments: