14 December, 2020

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेवूनच अल्पसंख्यांक हक्क दिन 18 डिसेंबरला साजरा करावा

 


हिंगोली दि. 14 :- कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गाची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत योग्य ती खबरदारी घेऊनच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने शुक्रवार 18 डिसेंबर 2020 हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

            कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना व्याख्याने, चर्चासत्रे ऑनलाईन वेबिनार इत्यादी पध्दतीने प्रसिध्दी द्यावी. जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबवावा, असेही जिल्हाधिकारी हिंगोली कार्यालयाकडून निर्देशित करण्यात आले आहे.

0000

 

No comments: