01 December, 2020

औंढा नागनाथ व सेनगांव नगरपंचायत निवडणूक हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

 

         हिंगोली,दि. 01 : राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 29 ऑक्टोबर, 2020 च्या पत्रानुसार जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगांव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागाचे प्रारुप, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदाचे आरक्षणाची अधिसूचना (प्रभागाच्या व्याप्तीसह) (अधिसूचना कलम 10 नुसार) जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर, नगरपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या अध्यक्षतेखाली औंढा नागनाथ नगरपंचायत व उपविभागीय अधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली सेनगांव नगरपंचायत येथील सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. तसेच प्रारुप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी औंढा नागनाथ व सेनगांव नगरपंचायतीच्या सूचना फलकावर, नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर व तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे.

वरील नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे तसेच सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीबाबत ज्या कोणास हरकती व सूचना सादर करावयाच्या असतील त्यांनी बुधवार, दिनांक 02 डिसेंबर, 2020 ते बुधवार दि. 09 डिसेंबर, 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपल्या लेखी हरकती व सूचना जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्याकडे सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

****

No comments: