हिंगोली, दि. 14 (जिमाका) : नांदेड येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व गुरु नानक नाम सेवा संगत (सिख, सिकलकरी, बंजारा, लबाना, सिंधी व मोहियाल) तसेच इतर सर्व समाजाच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी येथील मोदी मैदान (सार्वजनिक बांधकाम विभागाची मोकळी जागा, आसर्जन) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, कळमनुरी व वसमत तालुक्यांतील विविध शिकलकरी वस्तीत ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमानिमित्त नांदेड क्षेत्रीय समितीचे अशासकीय सदस्य हरनाम सिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात स्मृतीचिन्ह व माहितीपर पॅम्पलेटचे वाटप करून नागरिकांना कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या वेळी हिंद दी चादर कार्यक्रमाचे उद्दिष्ट, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व तसेच समाजात सद्भावना, बंधुता व एकतेचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment