12 March, 2022



 

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

 

हिंगोली, दि. 12 (जिमाका) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

******

No comments: