08 March, 2022

 कलापथकांच्या माध्यमातून नागरिकांना दिली जाणार

शासनाच्या विविध योजनांची माहिती

 

हिंगोली दि.8(जिमाका):- राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या दोन वर्षात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या योजनांची अधिकची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी हिंगोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  कलापथकांच्या माध्यमातून गावोगावी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

    हे कलापथक हिंगोली, सेनगाव, वसमत, औंढा (ना.), कळमनुरी तालुक्यातील जेथे मोठे आठवडी बाजार भरतात, तिथे व गर्दीच्या ठिकाणी शासनाच्या विविध विकास योजनांची कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोलीच्यातीने करण्यात आले आहे.

****

No comments: