21 March, 2022

 

स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 21 (जिमाका) : विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य नाविण्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 जाहीर केले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नवोदित उद्योजकांच्या कल्पनांना पोषक वातावरण पुरवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या स्टार्टअपची स्वप्ने साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्टार्टअप यात्रे दरम्यान प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्रा (Boot Camp and Pitching Session) चे आयोजन  करण्यात येणार आहे. या सादरीकरण सत्रामध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्यासाठी उत्तम उपाय, कृषी, शिक्षण, सेवा, कचरा व्यवस्थापन, पाणी , स्वच्छ उर्जा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त क्षेत्रातील नाविण्यतापूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगाची सविस्तर माहिती asstdiremp.hingoli@ses.gov.in किंवा  www.hingolirojgar@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावी. स्टार्टअप यात्रेबाबतची तारीख यथायोग्य कळविण्यात येईल. या यात्रेमध्ये जास्तीत जास्त नवोदित उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: