01 January, 2026

कळमनुरी तालुक्यातील 89 पोलीस पाटील पदांसाठी 5 जानेवारीला आरक्षण सोडत

हिंगोली (जिमाका), दि. 01 : कळमनुरी येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील कळमनुरी तालुक्यातील 89 गावांतील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस पाटील पदांच्या रिक्त 89 पदांसाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार गावनिहाय आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवार, दि. 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीच्या वेळी कळमनुरी तालुक्यातील सर्व संबंधित नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्या नागरिकांना या प्रक्रियेबाबत आक्षेप किंवा हरकती असतील, त्यांनी आपले लेखी स्वरूपातील आक्षेप दि. 6 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपविभागीय दंडाधिकारी, कळमनुरी यांच्या समक्ष उपस्थित राहून सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी केले आहे. ***

No comments: