13 January, 2020

औषध निर्माता पदभरती परीक्षेबाबत आक्षेप अर्ज सादर करावेत




औषध निर्माता पदभरती परीक्षेबाबत आक्षेप अर्ज सादर करावेत

            हिंगोली, दि.13 : अनुसूचित जमाती प्रवर्गातील विशेष भरती मोहिम प्रक्रीयेअंतर्गत दिनांक 12 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.30 ते 1.00 या वेळेत औषध निर्माता या पदासाठी परीक्षा केंद्र जिल्हा परिषदृ कन्या प्रशाला, हिंगोली येथे लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सदरील परीक्षेसाठी एकूण 148 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 118 उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी 105 उमेदवार दिनांक 12 जानेवारी,2020 रोजीच्या लेखी परीक्षेस हजर झाले होते.
            सदरील 105 उमेदवारांचे प्रश्नपत्रिका- उत्तरपत्रिकेची तपासणी परीक्षेनंतर लगेचच करण्यात आली व परीक्षेस उपस्थित उमेदवारांची प्राप्त गुणांची सर्वसाधारण यादी व औषण निर्माता या पदाच्या  लेखी परीक्षेची  प्रश्नपूस्तिका व उत्तरतालिका www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर दिनांक 12 जानेवारी, 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयाचे नोटीस बोर्डवर सुध्दा डकविण्यात आली आहे. तसेच औषण निर्माता पदाच्या प्रश्नपुस्तिका व उत्तरतालिका मधील प्रश्न अथवा उत्तराबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 15 जोनवारी, 2020 रोजी सायंकाळी 05.45 वा. कार्यालयीन वेळेत सह सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली येथे आवश्यक पुराव्यासह आक्षेप अर्ज सादर करावेत. विहित मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास त्याबाबत विचार केला जाणार नाही, असे सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा अति. मुख्या कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी कळविले आहे.
00000

 जिल्ह्यासाठी 347 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

हिंगोली, दि. 13 :-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत हिंगोली जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने माहे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍ह्यासाठी  347  क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-91.84 क्विं., औंढा ना.-निरंक, सेनगाव-170.25 क्विं., कळमनुरी-36.44 क्विं., वसमत-48.47 क्विं., असे जिल्ह्यासाठी एकूण 347 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.
0000000


No comments: