06 January, 2020




पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

हिंगोली,दि.6: ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर यांची  जयंती  ‘पत्रकार दिन’ म्हणुन साजरी केली जाते. यानिमित्त येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा पत्रकार संघचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, श्रीमती शांताबाई मोरे, डॉ. प्रल्हाद शिंदे, नजीर अहमद, कल्याण देशमुख, सुधीर गोगटे, केशव जोशी, सुभाष अपुर्वा, मिलींद वानखेडे, प्रकाश इंगोले, प्रा. उत्तम बलखंडे, बाबाराव ढोकणे, हाफीज बागवान, दिलीप हळदे, मकरंद बांगर, बालाजी पाठक, श्याम सोळंके, नंदकिशोर कांबळे, विजय गुंडेकर, चंद्रकांत वैद्य, निलेश गरवारे, आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती
****

No comments: