18 February, 2021

औरंगाबाद येथे 28 एप्रिल ते 21 मे या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

 


            हिंगोली, (जिमाका) दि. 18 : सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दि. 28 एप्रिल ते दि. 21 मे, 2021 या कालावधीत सोल्जर (जनरल ड्यूटी) , सोल्जर टेक्नीकल व सोल्जर ट्रेडसमॅन या पदासाठी औरंगाबाद येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            या भरतीसाठी सर्वप्रथम आपण www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंद करुन ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करुन घ्यावे.  तसेच अधिक माहितीसाठी  मुख्यालय भरती कार्यालय, पुणे यांच्या 020-26360349 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व जास्तीत जास्त उमेदवारांनी भरतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.

*****

No comments: