24 June, 2021

अनाथ व निराधार बालकांच्या संरक्षणासाठीच्या जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक संपन्न्‍ · पालकत्व हिरावलेल्या नव्याने मिळाले 23 बालके

 



अनाथ व निराधार बालकांच्या संरक्षणासाठीच्या जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक संपन्न्‍

·         पालकत्व हिरावलेल्या नव्याने मिळाले 23 बालके

 

हिंगोली, (जिमाका) दि.24 : कोविड-19 मुळे जिल्ह्यातीलपालकत्व गमावलेल्या बालकांची काळजी व सरंक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली. यावेळी यावेळी मुख्याधिकारी नगर परिषद श्री. कुरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे,  बाल कल्याण समिती सदस्या ॲड.वैशाली देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक श्रीमती सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲङअनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांची उपस्थिती होते.

जिल्ह्यात कोविड-19 या आजारामुळे 62 बालकांनी वडील अथवा आई आणि एका बालकाने आपले दोन्ही पालक गमावले आहे. या 62 बालकांच्या घरी जाऊन त्यांची भेटी घेऊन बालकांना व त्यांच्या पालकांना समुपदेशन करण्याचे काम देखील जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत वेळोवेळी केले जात आहे. तसेच जिल्ह्यातील एक पालक / दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कृती दलाचे सदस्य सचिव व्ही.जी.शिंदे यांनी यावेळी दिली.

            कोविड-19 या आजारामुळे ज्या बालकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे किंवा डिप्रेशनमध्ये जात आहेत किंवा गेले आहेत अशा सर्वांसाठी महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे संवाद 1800 102 4040 या टोल फ्री हेल्प लाईन नंबरची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये दररोज सकळी 08:00 ते सायंकाळी 08:00 वाजेपर्यंत संपर्क करुन आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा जिल्हा कृती दलाचे सदस्य सचिव यांनी केले आहे.

****

No comments: