07 June, 2021

मौजे ब्राह्मणवाडा येथील बाल विवाह रोखण्यास बाल संरक्षण कक्षास यश

 



हिंगोली, (जिमाका) दि. 07 : मौजे ब्राह्मणवाडा ता. सेनगाव जि. हिंगोली या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा बाल विवाह दि. 06 जून, 2021 रोजी लावून दिला जात असल्याची माहिती हिंगोली चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्री क्रमांकावर मिळाली असता, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार दि. 06 जून,2021 रोजी बाल विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

सद्याच्या लॉकडाऊनच्या काळातही लग्न सराईला वेग आला असून सेनगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावात एका अल्पवयीन मुलाचे बाल विवाहाचे नियोजन झाले असून सदर बाल विवाह होत असल्याची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, पो. हेड कॉन्स्टेबल व्ही. ई. कालवे यांनी सदरील गावातील सरपंच श्रीमती कौसाबाई राठोड, आंगणवाडी ताई कुसुमताई दायेदान या सर्वांनी मुलाच्या वडीलांची भेट घेतली व बाल विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे व या गुन्हास 1 लाख रुपये दंड व 02 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा असे दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच बाल विवाहाच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यात आले व ग्राम बाल संरक्षण समिती समक्ष लेखी जबाब लिहून घेण्यात आला व सदरील बाल विवाह रोखण्यात आला.

 

****

No comments: