25 June, 2021

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

 

विशेष  लेख :

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचा दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी. तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकुन राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ही योजना सुरु करण्यात आली आहे.

इयत्ता 10 वी मध्ये 75% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या अनू. जातीच्या मुला-मुलीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील अनु. जातीच्या मुला-मुलीसांठी आहे.

या योजनेतंर्गत दिले जाणारे लाभाचे स्वरुपाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. यात 11 वी आणि 12 वी मध्ये शिकणाऱ्या अनू. जातीच्या मुला-मुलीना रु. 300/- दरमहा (10 महिन्यासाठी रु. 3000/-) शिष्यवृत्ती मिळेल. या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी या विशेष शिष्यवृत्ती योजनेचा जरूर फायदा घ्यावा. अधिक माहिती व तपशिलासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा

****

अरुण सुर्यवंशी

जिल्हा माहिती अधिकारी, हिंगाली

No comments: