08 June, 2021

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

 


        हिंगोली (जिमाका), दि.08 : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस-3 दुसरा माळा, हिंगोली यांच्या विद्यमाने दि. 16 ते 20 जून, 2021 या कालावधीमध्ये ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

            या मेळाव्यास धुत ट्रान्समिशन प्रा.लि.औरंगाबाद, समस्था मायक्रोफायनान्स, सोलापूर या उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून त्यांना पुढीलप्रमाणे पदे भरावयाची आहेत. यामध्ये ईपीपी ट्रेनी, कस्टमर रिलेशनशिप ऑफीसर ही पदे आहेत. सदरील जॉब चे ठिकाण हे औरंगाबाद, लातूर, नांदेड, परभणी व उस्मानाबाद या पैकी असणार आहे. रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर एम्प्लॉयमेंट/रोजगार या पर्यायावर क्लिक करुन जॉब सीकर/नोकरी साधक हा पर्याय निवडावा. युजर आयडी व पासवर्ड द्वारे लॉग इन करुन प्रोफाईल मधील पंडीत  दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाद्वारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय करावे.

            इयत्ता 10 वी पास किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता, अभियांत्रिकी पदवी व आयटीआय पास उमेदवारांनी सदर मेळाव्यास ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

****

No comments: