31 January, 2025
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिध्द
• गुण पडताळणी अथवा त्रुटी, आक्षेप असल्यास 6 फेब्रुवारी पर्यंत संकेतस्थळावर नोंदवावी
हिंगोली (जिमाका), दि. 31 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 पेपर क्र. 1 (इयत्ता पहिली ते पाचवी), पेपर क्र. 2 (इयत्ता सहावी ते आठवी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पेपर एक व पेपर दोन साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी, आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर दि. 1 फेब्रुवारी ते दि. 6 फेब्रुवारी, 2025 पर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पध्दतीने नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दि. 6 फेब्रुवारी, 2025 पर्यंत mahatet24.msce@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे अनुराधा ढोक, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
हिंगोली जिल्हा महसूल सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
* हिंगोली जिल्हा महसूल सांस्कृतिक कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले उद्घाटन
* जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या एक प्यार का नगमा है गाण्याला रसिकांचा वन्समोर
* विजयी कलावंताना विभागीय महसूल सांस्कृतिक स्पर्धेत कला सादर करण्याची मिळणार संधी
हिंगोली (जिमाका), दि. 31 : हिंगोली जिल्हा महसूल सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन आज येथील कै.शिवाजीराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमास रसिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार सर्वश्री. श्रीकांत भुजबळ, जीवककुमार कांबळे, हरीश गाडे, सखाराम मांडवगडे, शारदा दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एक प्यार का नगमा है हे गीत गात उपस्थित रसिकांचा वन्समोर मिळवला.
या सांस्कृतिक स्पर्धेत समूह गायन प्रकारात कळमनुरीचा स्मिता सुर्यवंशी व इतर संघ प्रथम, एकपात्री कला प्रकारात वसमतच्या माधव वाडीकर यांना प्रथम, वैयक्तिक गीत गायनामध्ये विनोद डोणगावकर व नकुल वाघुंडे प्रथम, आम्रपाली चोरमारे द्वितीय, स्मिता सुर्यवंशी यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. समुह नृत्यामध्ये सुधाकर सराटे व संघ प्रथम, माधव वाडीकर व त्यांचा संघ द्वितीय आला आहे. युगल गीत गायनामध्ये प्रल्हाद गोटे व आम्रपाली चौरमारे यांना प्रथम क्रमांक, मृदंग वादन मध्ये दत्ता वालेकर यांना प्रथम क्रमांक, युगल नृत्यामध्ये किरण पावडे व दिपाली संघई यांना प्रथम क्रमांक, अभंगामध्ये शिल्पा सरकटे यांना प्रथम क्रमांक, नाटिकेमध्ये शिरीष आसेगावकर प्रथम, वैयक्तीक नृत्यामध्ये मारोती सिरसाट व शंभू दुभळकर यांना प्रथम, हार्मोनियम वादनामध्ये संदीप डोंगरे यांना प्रथम तर लावणीमध्ये व्यंकटी मनुरकर यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. या सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच या सर्व विजेत्यांना विभागीय स्तरावर जालना येथे दि. 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परीक्षक म्हणून शिल्पा नरसीकर व मंगेश पांडे यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसचांलन अशोक केंद्रेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, संजय घुगे, आक्रम शेख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
*******
जिल्हाधिकारी परिसरात सात कलमी कार्यक्रमांतर्गत स्वच्छता श्रमदान
हिंगोली (जिमाका), दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसात विविध अशा सात कलमी कार्यक्रमांतर्गत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ही मोहिम जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे. सात कलमी कार्यक्रमांतर्गत यानंतरही कार्यालय व परिसर स्वच्छता कार्यक्रम मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील व बाहेरील परिसरात जिल्हा प्रशासन व हिंगोली नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी व जेसीबी मशीनच्या सहायाने मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात आला. त्यामुळे हा परिसर स्वच्छ दिसत आहे. काही कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा आधार घेत प्रशासकीय इमारतीच्या खिडकीवर चढून स्वच्छता केली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपनगर अभियंता प्रतीक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील जवळपास दीडशे ते दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेसाठी हिंगोली नगर परिषदेच्या वतीने सफाईगार कर्मचारी, जेसीबी, कचरा वाहून नेणारे वाहन आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले .
*****
30 January, 2025
पैलपाडा येथील महाबीज उत्कृष्टता केंद्रावर रब्बी शिवार फेरीचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला अर्थात महाबीजमार्फत महाबीज उत्कृष्टता केंद्र, पैलपाडा येथे मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत शिवार फेरी रबी 2024-25 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या शिवार फेरीचे उद्घाटन दि. 28 फेब्रुवारी रोजी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाबीजचे ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख, संचालक डॉ. रणजित सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांनी अध्यक्षीय भाषणात महाबीज बियाणे संशोधनाची पुढील दिशा शेतकरीभिमुख राहील याची ग्वाही देऊन महाबीजच्या नवीन उपक्रमाबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. तसेच महाबीज बिजोत्पादन कार्यक्रम कसा फायदेशीर आहे, याचे महत्त्व विशद करुन राज्यातील शेतकरी बांधवांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाबीजचे ज्येष्ठ संचालक वल्लभराव देशमुख यांनी याप्रसंगी केले. महाबीजचे संचालक डॉ. रणजित सपकाळ यांनी महाबीज जैविक उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करुन याचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन केले.
या शिवार फेरी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाव्यवस्थापक (गुण नियंत्रक व संशोधन) डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी केले. यावेळी सदर प्रक्षेत्रावर महाबीज वनौषधी उद्यानाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीज परीक्षण अधिकारी राजेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक गणेश डहाळे यांनी केले.
या कार्यक्रमास अकोला विभागातील शेतकरी बांधव, महाबीजचे सन्माननीय भागधारक, बिजोत्पादक, महाबीज विक्रेते, महिला शेतकरी, महिलांचे विविध बचत गट तसेच महाबीजचे विभाग प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला अंतर्गत महाबीज उत्कृष्टता केंद्र, पैलपाडा येथे 57 एकर विस्तीर्ण प्रक्षेत्र आहे. रब्बी शिवार फेरीमध्ये महाबीज विपणन साखळीमधील तसेच अधिक उत्पादनशील गहू (33 वाण) व हरभरा (38 वाण) या प्रमुख पिकांसह संकरित ज्वारी, संकरित मका, जवस, संकरित बाजरी, सूर्यफुल व महाबीज संशोधित भाजीपाला पिकांच्या नवीन वाणांचा समावेश आहे. महाबीजव्दारे आयोजित शिवार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून याप्रसंगी शेतकरी बांधवांनी शिवार फेरीच्या शेतकरीभिमूख उपक्रमाचे नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक केले. शेतकरी बांधवांना रब्बी/उन्हाळी पिकांच्या विविध वाणांचे गुणधर्म एकाच ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवता येऊन पुढील हंगामात त्यांना त्यांच्या जमिनीस अनूकुल वाणांची निवड करणे सोईचे व्हावे हेच या शिवार फेरीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
दिनांक 29 जानेवारी रोजी शिवार फेरीस जळगाव, जालना व पुणे विभागातील पुरुष व महिला शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली असून दिनांक 4 फेब्रुवारी रोजी परभणी व नागपूर विभागातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत या शिवार फेरीची सांगता होणार आहे.
या शिवार फेरीत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भेट देऊन विविध रब्बी, उन्हाळी पिक/वाण व त्यांचे गुणधर्म, महाबीज जैविक उत्पादने, उत्ती संवर्धीत केळी यासंदर्भातील बहुमोल माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन महाबीजव्दारे करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता महाबीजच्या अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.
******
फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : उच्च न्यायालय, विधी व सेवा उपसमिती, औरंगाबाद यांच्या पत्रान्वये हिंगोली व परभणी जिल्ह्यामध्ये दि. 3 ते दि. 24 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरत्या लोक न्यायालय व शिबिरांच्या वाहनाचे उद्घाटन कार्यक्रम दि. 3 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा न्यायालय परिसर, परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा व तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या फिरते लोक न्यायालय व शिबीर कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
हिंगोली जिल्ह्यात दि. 4 फेब्रुवारी, 2025 रोजी वसमत तालुक्यातील बोराळा, आंबा, दि. 5 फेब्रुवारी रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील राजापूर, पिंपळदरी येथे, दि. 6 फेब्रुवारी रोजी कळमनुरी तालुक्यातील सांडस व पुयना येथे, दि. 7 फेब्रुवारी रोजी हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे आणि दि. 10 फेब्रुवारी, 2025 रोजी सेनगाव तालुक्यातील भानखेडा, वरुड चक्रपाणी येथे फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत.
परभणी जिल्ह्यात दि. 11 फेब्रुवारी, 2025 रोजी जिंतूर तालुक्यातील मानधनी, भोगाव देवी येथे, दि. 12 फेब्रुवारी रोजी येथे सेलू तालुक्यातील जवळा जिवाजी, मोरेगाव येथे, दि. 13 फेब्रुवारी रोजी मानवत तालुक्यातील किन्होळा व ताडबोरगाव येथे, दि. 14 फेब्रुवारी रोजी पाथरी तालुक्यातील लोणी व बाभळगाव येथे, दि. 15 फेब्रुवारी रोजी सोनपेठ तालुक्यातील विटा खुर्द व दुधगाव येथे, दि. 16 फेब्रुवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व राणीसावरगाव येथे, दि. 18 फेब्रुवारी रोजी पालम तालुक्यातील घोडा व पुयनी येथे, दि. 20 फेब्रुवारी रोजी पूर्णा तालुक्यातील लोखंडे पिंपळा व कात्नेश्वर येथे आणि दि. 21 फेब्रुवारी, 2024 रोजी परभणी तालुक्यातील पारवा व दि. 24 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालय परभणी येथे फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या फिरते लोक न्यायालय व शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
जिल्हा वार्षिक योजनेच्या 186 कोटी 59 लाखांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता, चालू वर्षाचा निधी प्राधान्यक्रम ठरवून वेळेत खर्च करावा - पालकमंत्री नरहरी झिरवाळ
* जिल्ह्यातील विविध विकास कामे गतीने पूर्ण करावेत-पालक सचिव रिचा बागला
हिंगोली (जिमाका), दि. 30 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी 186 कोटी 59 लाख रुपयाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, पालक सचिव रिचा बागला, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, चालू वर्षातील कामे तातडीने पूर्ण करुन निधी वेळेत खर्च करावा. पीकविमा अनुदान व अतिवृष्टीचे अनुदान देण्याची कार्यवाही राज्यस्तरावर सुरु आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच डीबीटीद्वारे अनुदान जमा होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भोसले यांनी शाळा व अंगणवाडी इमारतीच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवून क्रम लावावा. प्राधान्यक्रमानुसार कामे प्रस्तावित करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी राज्याकडून जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी एक बैठक घेऊन ठरविण्यात येईल, असे सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी सन 2024-25 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
यावेळी आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी जिल्ह्यात रोजगार, आरोग्य, शिक्षण यासह सिंचन विकासावर भर द्यावा आणि जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासामध्ये महत्वाच्या ठिकाणाचा समावेश करावा. तसेच सर्व कामे दर्जेदार व्हावीत, अशा सूचना केल्या. आमदार राजू नवघरे यांनी शाळा, अंगणवाडी इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती, ग्रामीण रस्ते, सीसीटीव्ही, पीकविमा, अतिवृष्टी अनुदान तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. आमदार तानाजी मुटकुळे यांनी एमआयडीसीतील रस्ते व इतर सुविधासाठी अतिरिक्त निधीची मागणी करावी, तसेच सिंचनासाठी बंधारे बांधणे, चिरागशहा तलाव दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना व मागण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने त्याचे निरसन करावे व केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित सदस्यांना वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
नियोजन विभागाने दिलेल्या कमाल आर्थिक मर्यादेनुसार सन 2025-26 या वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनासाठी 186 कोटी 59 लाख तर अनुसूचित जाती उपयोजनासाठी 52 कोटी 11 लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत 23 कोटी 79 लाख 70 हजार अशा एकूण 262 कोटी 49 लाख 70 हजार खर्चाच्या तयार केलेल्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पालक सचिव रिचा बागला यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे गतीने पूर्ण करावेत. चालू वर्षाची कामे प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही तातडीने पूर्ण करुन आपणास दिलेला निधी वेळेत खर्च करावा. उर्वरित शिल्लक असलेला निधी लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. विविध विकास कामासाठी मान्यता देण्यासाठी जागेची अडचण आल्यास ती तातडीने सोडविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सन 2025-26 चा प्रारुप आराखडा मान्यतेसाठी समितीसमोर सादर केला. तसेच सन 2024-25 च्या खर्चाचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच सन 2024-25 चा निधी शंभर टक्के निधी खर्च करण्यात येईल. तसेच शासनाच्या आदेशानुसार यातील 25 टक्के निधी विकास आराखड्यावर खर्च करण्यासाठी मान्यता द्यावी, असे सांगितले. तसेच पंतप्रधान पिकविमा योजनेची रक्कम व अतिवृष्टीचे अनुदान अदा करण्याची कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.
शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे यांनी बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक सुनिल बारसे तसेच सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थिती होती.
*******
जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि आदर व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांनी मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, नायब तहसीलदार सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
******
खरेदी व विक्रेत्यांकडून कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प अंतर्गत खरेदीदार व विक्रेता संमेलन कार्यशाळेचे आयोजन अकोला रोडवरील एका हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सहा करार करण्यात आले.
स्मार्ट प्रकल्पाचा उद्देशाबाबत भास्कर कोळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पुरवठा मूल्यसाखळी तज्ञ जी. एच कच्छवे यांनी उपस्थित खरेदीदार यांना संक्षिप्त माहिती दिली. त्यानंतर सर्व यंत्रणा प्रमुख तसेच दत्तगुरु शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक गंगाधर श्रृंगारे, कयाधू शेतकरी उत्पादक कंपनीचे महेंद्र माने, श्री फाळेश्वर महाराज शेतकरी उत्पादक कंपनीचे मारोती वैद्य यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ओमप्रकाश गलांडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही. बी. जगताप, व्हीएसटीएफ यंत्रणेचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन विभागाचे प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणेचे स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मंजुरी प्राप्त असलेले एकूण 24 कंपनीचे संचालक, एडीएम लातूरचे प्रतिनिधी हनुमंत चामवाड, गंगाधर शृंगारे, भव्या इंटरप्रायसेस, विठ्ठल दालमिल, पुरुषोत्तम बाहेती, फार्म को अग्रो प्रोडक्ट संचालक विष्णू कायंदे, पांडुरंग माऊली शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक जगन्नाथ गादेकर, रिधान ॲग्रो फूड पार्कचे संचालक स्वप्नील लोने, आदित्य ट्रेडिंग कंपनी संचालक विशाल काबरा आदी खरेदीदार, विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा अंमलबजावणी कक्षातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
*******
दोन दिवशीय 'हिंगोली ग्रंथोत्सवा'चा उत्साहात समारोप
हिंगोली (जिमाका), दि. 30 : येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय 'हिंगोली ग्रंथोत्सवा'चा समारोप उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक हे होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, प्रा. जी. पी. मुपकलवार, नामदेव वाबळे, प्रा. जी.पी. मुपकलवार, राजकुमार दुबे, संतोष ससे, विश्वनाथ डोंगरे, विनोद कावडे, दिलीप माळवटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते.
प्रा.जी.पी. मुपकलवार यांनी ज्ञान प्राप्त करण्यासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. नवीन पिढी घडवायची असेल तर आपण वाचन करणे आवश्यक आहे. आपण जोपर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. स्वत:चा, राज्याचा, देशाचा, समाजाचा विकास करायचा असेल तर ग्रंथवाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देऊन ते टिकवण्याची गरज आहे. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, त्यामुळे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांनी बालकांमध्ये वाचन चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाने बालवाचन कक्ष समृद्ध केले पाहिजे, असे सांगून या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास खरात यांनी केले, तर आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. याप्रसंगी ग्रंथविक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दिव्या निंबाळकर यांनी महाराष्ट्र गीत तर मधुरा सिसोदे यांनी खरा तो एकची धर्म हे गीत सादर केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज - मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि संवर्धन या विषयावरील व्याख्यानात वक्त्यांचा सूर
हिंगोली (जिमाका), दि. 30 : मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी जागरुक राहून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्याख्यानातून व्यक्त केले.
येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अशोक अर्धापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. विलास खरात म्हणाले, माणसाला प्रत्येक भाषा अवगत झाली पाहिजे, असे सांगून मराठी भाषा ही समृध्द आणि श्रीमंत आहे. त्यामध्ये अनेक शब्दसंग्रह आहेत. मराठी भाषा ही विविध अलंकारांनी नटलेली आहे. मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात मराठी भाषेतील अनेक शब्द लुप्त होत चालले आहेत. त्यामुळे भाषेचे संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव यांनी मराठी भाषेला पूर्वेतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचे संवर्धन करुन ठेवले आहे. काही दिवसापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या दर्जामुळे शासन, प्रशासन यांनी भाषेची धोरणात्मक उपक्रम राबविण्यासाठी व या भाषेच्या उत्थानासाठी दर्जा दिला आहे. सध्या इंग्रजी शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे नागरी आणि शहरी भागात मराठी भाषेची भिती निर्माण झाली आहे. मराठी भाषा ही श्रीमंत आणि संपन्न आहे. आपल्या घरात नेहमी मराठी भाषा बोलली पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात अशोक अर्धापूरकर यांनी मराठी भाषा ही अगोदरपासूनच वैभवशाली भाषा आहे. मराठी भाषा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. या भाषेचे मूळ रुप शोधण्याची गरज आहे. भाषा शुध्दीकरणाचे प्रयोग चालू असले पाहिजेत. मराठी भाषेपासून भरकटत चाललेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मराठी भाषेच्या सर्वंधनासाठी सर्वांनी जागरुक राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कल्याण वसेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी केले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
29 January, 2025
'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' आणि 'वीर बिरसा मुंडा' यांच्या कार्याला व्याख्यानातून उजाळा
• हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक - शिवाजी पवार
हिंगोली (जिमाका), दि. 29 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि वीर बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला.
येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि वीर बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य तसेच भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अशोक अर्धापूरकर उपस्थित होते.
या व्याख्यानात अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर बोलताना प्रा. डॉ. सुनंदा भुसारे यांनी अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी देशभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, एवढेच नव्हे तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखले. प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात कितीही अडचणी, दुःख असले तरी त्याचे पडसाद सामाजिक जीवनात कधीच दिसून आले नाहीत. त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी काम केले. त्यांच्या राज्यातील प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले. प्रजाहितदक्ष अहिल्याबाई जीवनभर सतीचे आयुष्य जगल्या. त्यांनी शेतकरी, महिलांची सुरक्षा व विधवा महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार यासाठी विशेष प्रयत्न केले. प्रजेच्या सुखासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी अहिल्याबाई अखंड करत राहिल्या. त्याचे धैर्य, शौर्य, चातुर्य, वात्सल्य, माधुर्य, भक्ती आणि विरक्ती अशा सप्तरंगी गुणांनी युक्त असे त्यांचे जीवन हे कर्तृत्वाचा आदर्श दाखवणारे आहे. अहिल्याबाई होळकर या उत्कृष्ट समाज कार्य, राजकारण तसेच सुशासन निर्माण करण्याचे काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रा. डॉ. सतीश ढाकरे यांनी वीर बिरसा मुंडा यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रकाश टाकला. यामध्ये त्यांनी वीर बिरसा मुंडा हे एक आदिवासी स्वातंत्र्यसेनानी आणि लोकनायक, क्रांतिकारक होते. त्यांनी ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध आदिवासींमध्ये उलगुलान चळवळ केली होती. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर, 1875 रोजी झारखंडमधील उलिहातू या गावी झाला होता. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसांचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले. बिरसांना आपल्या वडिलांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातूनच जंगलातील संपत्तीवर स्थानिक आदिम जमातीच्या लोकांना अधिकार मिळविण्यासाठी त्यांनी जंगल स्वराज्य मिळविण्यासाठी वनासाठी नानक ही संकल्पना स्थापन केली होती. या संघटनेतील सर्व सदस्यांना विविध शस्त्रे, हत्यारे तयार करण्याचे काम सोपविले होते. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून ब्रिटीश अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडा यांनी लढा उभारला होता. इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. आणि 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला, असे त्यांचे जीवन कार्य असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अध्यक्षीय समारोपात माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयावर प्रकाश टाकताना म्हणाले, आपल्या देशाला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी अथक परिश्रम घेतले. 1942 उठावानंतर राज्यघटना तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. 1946 मध्ये भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. तसेच या घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन ते तीन वर्षे विविध देशातील घटनांचा अभ्यास करुन सर्व समाजातील घटकातील लोकांना न्याय मिळण्यासाठी सर्वसमावेशक घटना तयार केली. आणि शेवटी 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारताची राज्यघटना अंमलात आली. लोकशाही पध्दतीची घटना तयार केली. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही या तत्वाचा अवलंब करुन धर्म, भाषा, लिंग याचा कुठलाही भेदभाव या घटनेत ठेवलेला नाही. या घटनेतून सर्वांना समान सामाजिक, आर्थिक न्याय मिळावा आणि गरीब व श्रीमंत यातील दरी कमी करण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे ही घटना सर्वसमावेशक आहे. सरनामा हा या घटनेचा आत्मा आहे. या घटनेचा सरनामा उद्देशिकेच्या माध्यमातून थोडक्यात मांडला आहे. त्यामुळे हा सरनामा आपण स्वत: प्रती अर्पण करत आहोत. या घटनेची अंमलबजावणी करताना आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे, असे सांगितले.
या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कल्याण वसेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. जी. पी. मुपकलवार यांनी केले. या व्याख्यान कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**
राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर 'कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च' या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड 'एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब' आणि 'मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती' यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.
त्याअनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे नुकतेच करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी फेब्रुवारी 2025 ते डिसेंबर 2025 दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती गोळा करतील.
नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त, अर्थ व सांख्यिकी व संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
******
जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 अन्वये राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
वाहनांना नंबरप्लेटमध्ये बनावगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे आहे. तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी दि. 1 एप्रिल, 2024 पूर्वीच्या त्यांच्या जुन्या वाहनाना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
हिंगोली जिल्ह्याकरिता मे. एफटीए एचएसआरपी सोल्यूशन प्रा.लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी https://maharashtrahsrp.com हे बुकींग पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. तर परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन 31 मार्च, 2025 पर्यंत त्या बसवून घ्याव्यात. वाहनधारक हिंगोली कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त हिंगोलीमध्ये वाहन वापरत असेल तरीही वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी व ट्रॅक्टरसाठी 450 रुपये, तीनचाकी वाहनासाठी 500 रुपये आणि इतर सर्व वाहनासाठी 745 रुपये याप्रमाणे जीएसटी वगळून दर आकारण्यात येणार आहेत.
वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठा धारकाच्या पोर्टलवर तसेच हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करु शकतात.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनावर ही नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी प्लेट असलेली वाहनांवर परिवहन कार्यालयाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
आदिवासी लाभार्थ्यांनी विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : सन 2024-25 मधील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर आराखड्यानुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील त्या-त्या भागातील सर्व इच्छूक आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज वितरण व स्वीकारण्याचे अंतर कमी व्हावे यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली व पंचायत समिती जिंतूर जि. परभणी येथे दि. 3 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी, 2025 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून अर्ज वितरण व स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आदिवासी समाजातील लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
आदिवासी समाजातील उच्चशिक्षित लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर लॅपटॉप घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, वन हक्क अधिनियम 2006 अन्वये शेती मिळालेल्या लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर शेती अवजारे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे (फक्त वन विभागाची जमीन असलेल्या लाभार्थ्यानीच अर्ज सादर करावेत.) . आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर फवारणी पंप घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, भूमिहीन प्रमाणपत्र असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर मळणीयंत्र घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी लाभार्थ्यांना आपत्कालीन मदत करणे, आदिवासी बचत गटांना शेळी गट (10 शेळी व 1 बोकड) घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे आदी योजनांचा समावेश आहे.
विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली यांनी राखून ठेवलेला आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन सुनिल बारसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.
******
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी सेनगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 29 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने दि. 3 फेब्रुवारी, 2025 रोजी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कार्पोरेशन महाराष्ट्र इंदरनॅशनल (नोकरी ठिकाणी इस्त्राईल) . मनसा मोटर्स (महिंद्रा)/(टाटा मोटर्स) हिंगोली, टेक्नीकल सर्व्हीस प्रा.लि.पुणे, नवभारत फर्टिलायझर लि. छत्रपती संभाजीनगर, भारत फायनांन्स लि. हिंगोली, नम्र फायनांन्स लिमिटेड नांदेड, पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि. पुणे/नागपूर, क्रिडेट एक्सेस ग्रामीण लि.हिंगोली, उत्कर्ष स्मॉल फायनांस बँक नांदेड, सॉपिओ आनेलिटिक्स नोडल एजन्सी हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इन्श्युरन्स हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनी व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 450 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करुन स्वत: मूळ कागदपत्रासह तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे सोमवार, दि. 3 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
******
28 January, 2025
ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली (जिमाका), दि. 28 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात कवींनी सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबनविषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवि संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. राजाराम बनसकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी प्रमुख कवी प्रा. विलास वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कवी संमेलनात प्रा. विलास वैद्य यांनी काल माझ्या सपना कागुद ग आला, प्रकाश अंभोरे यांनी पाऊस मोलाचा, गोडाजी काळे यांनी तुका, श्रीमती पारिजात देशमुख यांनी माझं घरटे, गणेश आघाव यांनी पोरी शाळेत निघाल्या, सिंधूताई दहिफळे यांनी अवकाळी पावसाचा कहर होतो, करण हरण यांनी कुठे आहे आराम जीवाला, संगीता चौधरी यांनी नेहमीच पाँझेटीव्ह राहायचे, अनिकेत देशमुख यांनी नांगराचा फाळ असते, भजनाचा टाळ असते, सुमन दुबे यांनी गजल, दिगांबर जाधव यांनी शाळा अनुदान, राधिका देशमुख यांनी बोबड्या बाळाची कविता, राजकुमार मोरगे यांनी तिला भेटलो म्हणून बरे वाटते, प्रिया धुमाळ यांनी सखी, गणेश येवले यांनी गझल, दर्शना भुरे यांनी नात्यातील गैरसमज, हर्षवर्धन परसवाळे यांनी माय मराठी, प्रा. डॉ.अंजली टापरे यांनी वाट, विजय गुंडेकर यांनी स्वातंत्र्य सैनिक, सुप्रिया दापके यांनी निपुण हिंगोली, रघुनाथ घुगे यांनी स्वार्थ, डॉ. वंदना काबरा यांनी मायची माया, बबन दांडेकर यांनी मानवता, राजाभाऊ बनसकर यांनी टाळ, शिला कांबळे यांनी रमाई, प्रशांत बाहेती यांनी मेरी नौकरी, डॉ.दिलीप धामणे यांनी झोका, शिलवंत वाढवे यांनी शेतकऱ्यांची व्यथा ही कविता सादर केली.
यावेळी प्रा. विलास वैद्य यांनी कविता हा माझा प्राण असल्याचे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर या कवि संमेलनाचा अध्यक्षीय समारोप प्रा. राजाराम बनसकर यांनी केले. प्रास्ताविक अशोक अर्धापूरकर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन आडे, कलानंद जाधव यांनी केले. तर शेवटी आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष ससे, संतोष सामाले, रामेश्वर गांजने, लक्ष्मण लाड, लक्ष्मण सावळे, मिलींद सोनकांबळे, शंभुनाथ दुभळकर यांनी परिश्रम घेतले. या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
पुस्तके आयुष्यात दिशादर्शकाचे काम करतात -- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे
हिंगोली (जिमाका), दि. 28 : सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वाचे आहेत. ग्रंथोत्सवातून आचार-विचारांचे प्रदान झाले पाहिजे. त्यामुळे पुस्तके हे आयुष्याला, दिशा, गती आणि आकार देण्याचे काम करतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उप शिक्षणाधिकारी नितीन नेटके, प्रा. विलास वैद्य, प्रा.खंडेराव सरनाईक, गजेंद्र बियाणी, प्रा.जी. पी. मुपकलवार, श्रीमती सुमन दुबे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. लोमटे म्हणाले, पुस्तके आपणाला एकत्र आणण्याचे काम करतात. ग्रंथ वाचनातून ऊर्जा मिळते. जीवनात पुस्तके दृष्टी देतात. दृष्टी असेल तर अनेक महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करतात. कला, साहित्य, संस्कृती हे एकमेकास पूरक असून ते हातात हात घालून चालत असतात. कला आयुष्य उजळून टाकतात. पुस्तक हे आपले आयुष्य बदलते. संत ज्ञानेश्वरी, तुकारामाची अभंग गाथा ही मराठीची समृध्द परंपरा आहे. ज्ञानदीप लावू जगी या म्हणीप्रमाणे संत नामदेवांनी मराठी साहित्य समृध्द करण्याचे काम केले आहे. मराठी साहित्याला संत साहित्याची दिशा असल्यामुळे मराठी साहित्य समृध्द आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे खरे ज्ञान हे पुस्तकात आहे. पुस्तके आरपार दृष्टी देण्याचे काम करतात. शहीद भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पुस्तक वाचनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावरुन क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची ज्ञानावरची निष्ठा दिसून येते. ज्ञानावरची निष्ठा खरे आदर्श आहे. पुस्तके वाचली पाहिजेत. ज्ञान हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे ज्ञान हे कशानेही कमी होत नाही. त्यामुळे ग्रंथ हेच सगळ्यात मोठी संपत्ती असल्यामुळे सर्वांनी ग्रंथाचे वाचन करावे. ग्रंथाचे मंथन, चिंतन व्हावे, ग्रंथाविषयी प्रेम वाढावे, या हेतूने हा ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी आहे. संत नामदेव महाराजामुळे हिंगोलीची ओळख संपूर्ण देशात झाली आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही वापरापासून दूर ठेवले पाहिजे. तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे वळविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी वाचन संस्कृती रुजवा- पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
ग्रंथ हे आपल्याला दिशा देतात. त्यामुळे ग्रंथाचे वाचन करण्याची गरज आहे. ग्रंथ हे मनाला आनंद देण्याचे काम करतात. मुलांच्या आवडीनुसार मुलांना पुस्तके वाचायला देऊन त्यांच्यामध्ये पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करावी लागणार आहे. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन चळवळ विकसित होईल व त्यातून व्यक्तीमत्व विकास साधता येईल. पालकांनी पुस्तके खरेदी करावीत व त्यांचे वाचन करावे आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी म्हणाले, सध्या समाज माध्यमाचा वापर वाढला आहे. त्यातूनही त्याला विविध पर्याय आहेत. त्यामुळे पुस्तके वाचण्यासाठी स्टोरी टेल यासारखे विविध व्यासपीठ उपलब्ध झाले आहेत. याचा वापर करुनही पुस्तके वाचता येतात. त्यामुळे ग्रंथ वाचने आवश्यक असून ही ग्रंथ चळवळ लोकापर्यंत पाेहोचविणेही तितकेच महत्वाचे आहे. विविध मान्यवर लेखकांची पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवले पाहिजेत. ज्ञानाचा गाभारा ग्रंथ आहेत. पुस्तके वाचल्याशिवाय संस्कृती समजत नाही. पुस्तकाच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजेत, असे सांगितले.
यावेळी गजेंद्र बियाणी यांनी प्रत्येक घरात पुस्तके असली पाहिजेत. मुलांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण करावी. ग्रंथावर प्रेम करण्यासाठी आवड निर्माण करावी, ग्रंथ हे आपणाला प्रकाशाची वाट दाखवतात. असे सांगितले. तर अशोक अर्धापूरकर यांनी मराठी भाषा टिकविण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. मराठी भाषेची गळचेपी थांबविण्यासाठी ग्रंथ चळवळ पालक व मुलांमध्ये रुजली पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी लेखिका सुमनताई दुबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
ग्रंथांमध्ये पिढ्या घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे ग्रंथ चळवळीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नामदेव दळवी यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार गजानन शिंदे यांनी मानले. यावेळी सुमन दुबे लिखित ‘बैरंग लिफाफे’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गंगादेवी देवडा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद
ग्रंथोत्सवानिमित्त आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून ते जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, सत्यनारायण विद्या मंदीर, सिध्देश्वर वारकरी संस्था सापडगाव, शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय, गुरुदास काम माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे वेशभूषा, लेझीम नृत्य सादर केले.
या ग्रंथोत्सवामध्ये शासकीय ग्रंथागार छत्रपती संभाजीनगर, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, जिल्हा माहिती कार्यालयाचे लोकराज्य मासिकाचे स्टॉल, अभंग पुस्तकालय, श्री गणेश बुक डेपो, विद्याधन प्रकाशन, प्रगती बुक डेपो, सार्थक बुक सेल्स यासह विविध पुस्तकाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, कैलास लांडगे उपस्थित होते.
******
27 January, 2025
जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात 31 जानेवारी रोजी स्वच्छता श्रमदान
हिंगोली (जिमाका), दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसात विविध अशा सात कलमी कार्यक्रमांतर्गत दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 7 ते 9 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह दि. 31 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 7 ते 9 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
******
करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन शिबीर 31 रोजी
हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर मार्फत शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत करिअर मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी या विषयावर दि. 31 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 2 ते 3 या वेळेत https://meet.google.com/sxw-gend-sdm या लिंकवर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये नवनाथ टोनपे, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली हे मार्गदर्शन करणार आहेत.
या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेण्यासाठी meeting URL: https://meet.google.com/sxw-gend-sdm या ऑनलाईन लिंकवर क्लिक करावे. आपल्याकडे गुगल मीट ॲप (google meet app) यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इन्स्टॉल करुन घ्यावे. आपण गुगल मीट ॲप (google meet app) मधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉइन (Ask to join) वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे अगोदर जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडिओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करुन विचारावे व लगेच माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावेत. या सर्व सूचनांचे पालन करुन मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी व्हावेत.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील उमेदवारांनी ऑनलाईन मोफत मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. रा. म. कोल्हे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
******
निशुल्क ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर मार्फत शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील युवक, युवतीसाठी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका सुरु आहे.
या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा, बँकीग, रेल्वे विभाग, चालू घडामोडी, वर्तमानपत्रे व मासिके इत्यादी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच सुशिक्षित युवक व युवतींना रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन शिबीर व ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशनाचे नियमितपणे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील गरजू युवक व युवतींनी या निशुल्क ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेत प्रवेश करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय मध्यवर्ती इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा अथवा 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.
******
बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज पसरवू नये
हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्यात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात, ठाणे जिल्ह्यातील कोपरी या गावातील पक्षांमध्ये व लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी कावळ्यामध्ये झालेली मरतूक ही एव्हीएन इन्फल्यूएन्झा (बर्ड फ्लू) H5N1 या आजाराने झाल्याचे निदान राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान, भोपाळ यांनी कळविले आहे. या आजाराचा राज्यातील इतर भागात फैलाव होण्याची तसेच बाजारामध्ये अंडी, चिकन विक्रीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. पक्षाची मरतूक आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक 18002330418 / 1962 वर त्वरित संपर्क करावा. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
******
जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
हिंगोली (जिमाका), दि. 27 : जानेवारी महिन्यात हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिले आहेत.
दि. 28 जानेवारी रोजी लाला लजपतराय जयंती व शब-ए-मेहराज (बडीरात) असून विविध देवी देवतांच्या वार्षिक यात्रा व उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, शंकर पटाच्या शर्यती, कब्बडी, कुस्ती आयोजित करण्यात येतात. तसेच मराठा आरक्षण संबंधाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून धनगर, ओबीसी आरक्षण व इतर समाजाचे आरक्षणसंबंधी चालू असलेली आंदोलने व सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 25 जानेवारी, 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 9 फेब्रुवारी, 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
******
26 January, 2025
हिंगोली येथे 28 व 29 जानेवारीला ग्रंथोत्सव ग्रंथ प्रदर्शन-विक्री, नवोदितांचे कवी संमेलन, परिसंवाद, व्याख्यानाची मेजवानी
हिंगोली (जिमाका), दि. 26 : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, कार्यालय हिंगोली यांच्या विद्यमाने ‘हिंगोली ग्रंथोत्सव-2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. कै.रं.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर, हिंगोली येथे मंगळवार, दि. 28 व बुधवार, दि. 29 जानेवारी, 2025 असे दोन दिवसात ग्रंथप्रेमींना विविध कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. ग्रंथप्रसार, प्रदर्शन व विक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश असून त्यात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कै.र.रा.बियाणी नुतन साहित्य मंदिर वाचनालय, बियाणी नगर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचा शुभारंभ होणार आहे. या दिंडीमध्ये विविध लोककला सादरीकरण लेझिम पथक, भजनी मंडळ यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील-आष्टीकर, मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री सतिश चव्हाण, विक्रम काळे, श्रीमती डॉ. प्रज्ञा सातव, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, औरंगाबाद येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, गजेंद्र बियाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 28 जानेवारी, 2025 रोजी दुपारच्या सत्रात दुपारी 3 ते 6 या वेळेत "कवी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. तर दि 29 जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत भारतीय राज्यघटनेचा सरनामा या विषयावर प्रा. डॉ. प्रमोद इंगोले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रा. डॉ. सुनंदा भुसारे यांचे, वीर बिरसा मुंडे यांचे जीवन आणि कार्य या विषयावर प्रा. डॉ. सतीश ढाकरे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी 3 ते 4 या वेळेत मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि संवर्धन या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर दुपारी 4 वाजता दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीने केले आहे.
******
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा विकास आराखडा व जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न राहील
- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली (जिमाका), दि. 26 : हिंगोली जिल्ह्याच्या शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्राचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करावे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्ते व पूल पुरात वाहून गेले आहेत. ते प्राधान्याने दुरुस्त करावेत.
सीसीटीव्ही व इतर सुविधेसाठी निधीची आवश्यकता असल्यास तशी मागणी नोंदवावी. तसेच ग्रामीण रस्त्याची कामे मागणीप्रमाणे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी सन 2024-25 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचनाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.
यावेळी आमदार राजू नवघरे यांनी शाळा खोल्याचे बांधकाम, शाळेला कंपाउंड वॉल, सिध्देश्वर धरणावर पर्यटन स्थळ विकसित करणे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणे यासह विविध कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार पुढील पाच वर्षात कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजनेत सन 2024-25 या वर्षासाठी 277 कोटी रुपयाचा निधी मंजूर असून आतापर्यंत 110 कोटी निधी प्राप्त झाला आहे. 241 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत विविध यंत्रणांना 81 कोटी रुपये वितरीत करण्यात आले असून त्यापैकी 66 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. शासनाकडून उर्वरित निधी प्राप्त होताच संबंधित यंत्रणेला निधी वितरीत करुन शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिली. तसेच सन 2025-26 चा 186.59 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक सुनिल बारसे तसेच सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
******
राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ
हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन 2024-2025 अंतर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित चित्ररथाला आज येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार-प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार-प्रसिध्दी करणार असल्याने नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता शासकीय वसतिगृह व निवासी शाळा चालविणे, अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, रमाई आवास योजना (घरकुल), सैनिक शाळेतील अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र प्रवर्गाया विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनाची जिल्ह्यातील लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रसिध्दी करणार आहे. त्यामुळे या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना, बालविवाह प्रतिबंधक कायदा : सन 2006, मागेल त्याला सौर कृषि पंप योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत मागासवर्गीय मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृह, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, रमाई आवास योजना (घरकुल) या कल्याणकारी योजनांवर आधारित तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी विमोचन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी चित्ररथ आणि भित्तीपत्रिकाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, आशाताई बंडगर, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.
*****
प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी योजना यशस्वीपणे राबविण्यास कटिबध्द
-- पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली (जिमाका), दि.26 : हिंगोली जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज झाले. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासात झेप घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या विविध विभागामार्फत 100 दिवसात करावयाच्या कामाचा आराखडा तयार केला आहे. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 7 कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन 100 दिवस’च्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत 100 दिवसात शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय सुधारणा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात सप्टेंबर, 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांच्या 2 लाख 95 हजार 171 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना जवळपास 419 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्ह्यामध्ये कृषि विभागाने ॲग्रीस्टॅक योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ‘शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे सुलभ होणार आहे. एकत्रित डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवानी या योजनेत आपला सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे श्री. झिरवाळ म्हणाले.
शासनाने शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाचे ध्येय लक्षात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांबाबत आपला दृष्टिकोन बदलला आहे. आता प्रत्येक हाताला काम व कामाप्रमाणे दाम इथपर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक हाताला काम, कामाप्रमाणे दाम व शाश्वत उत्पन्नाकरिता पाहिजे ते काम या उद्देशाने वैयक्तीक स्वरुपाच्या कामावर भर दिला आहे. यावर्षी मनरेगाअंतर्गत शेतीपूरक विविध योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांना उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात यावर्षी 850 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 489 लाभार्थ्यांनी 468 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचा लाभ घेतला असल्याचे श्री. झिरवाळ म्हणाले.
हिंगोली येथील शासकीय महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षात 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी 100 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हे महाविद्यालय मानाचा तुरा ठरत आहे. तर जिल्हावासीयांच्या आरोग्यविषयक सोयी सुविधांसाठी महत्त्वाचे आणि नजिकचे रुग्णालयही ठरले आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध होणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात 50 बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर ब्लॉक, 100 बेडचे स्त्री रुग्णालय, गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी एमआरआय मशीन लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
जिल्ह्यात चला जाणूया नदीला या अभियानाच्या माध्यमातून जलसाक्षर करण्यासाठी जलदूत नेमण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्याने राष्ट्रीय जीवन्नोनती अभियान (एनआरएलएम) पोर्टलवर 100 टक्के आधार सिडींग करत देशात व राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच सन 2024-25 मध्ये हिंगोली जिल्ह्याने LokOS (लोकोस) मध्ये स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघाचे शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांना छोटे व्यवसाय सुरु करण्यासाठी झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील विविध विज ग्राहकांचे नादुरुस्त रोहित्र त्वरीत बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 4 कोटी 32 लाख रुपयांचा निधीतून 100 केव्ही क्षमतेचे 250 विद्युत रोहित्र खरेदी करण्यात आले आहे. उर्जेची गरज भागविण्यासाठी पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री कुसुम योजना व मागेल त्याला सौर कृषि पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये आतापर्यंत जवळपास 7 हजार सौर कृषि पंप बसविण्यात आले आहेत. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतंर्गत ते बसवून देण्याचे काम चालू आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कृषि पंपाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी क्रांतिकारी अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा नियमित व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात वसमत येथे मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या संशोधन केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे काम चालू आहे. वसमत हळद या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनांचा दर्जा प्राप्त झाला आहे. याचा हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा दोन साठी हिंगोली जिल्ह्यातील 148 गावांना शासनाने मंजुरी दिली आहे. या गावातील ग्राम कृषि विकास समिती सदस्य व सरपंच यांचे प्रशिक्षण घेण्याचे प्रकल्प स्तरावरुन नियोजन असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
हिंगोली नगर परिषदेने माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून 4 कोटीचे बक्षीस मंजूर झाले आहे. हिंगोली शहराच्या पुरातन जलेश्वर मंदिरालगत असलेल्या तलावाचे सुशोभिकरण करण्यात येत असून तलावाच्या संरक्षण भिंती, तलावातील गाळ काढणे यासह इतरही महत्त्वाची कामे सुरु आहेत. या तलावाच्या सुशोभिकरणामुळे हिंगोली शहराच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय संविधानातील मूल्यांमुळेच भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास राज्य तसेच आपल्या हिंगोली जिल्ह्याची चौफेर प्रगतीसाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री नहररी झिरवाळ यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखूवन शुभारंभ केला. तसेच त्यांनी यावेळी भित्तीपत्रिकेचीही विमोचन केले. तसेच महिला व बालविकास विभागाच्या बालविवाह मुक्त हिंगोली जिल्हा स्वाक्षरी अभियानाची सुरुवात पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी केली.
याप्रसंगी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. यावेळी हळद संशोधन केंद्र, कृषि विभाग, रेशीम विभाग, परिवहन विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास यासह विविध विभागाचे चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते.
तसेच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शहीद गणपत भिकाजी रणवीर यांचे विर पिता भिकाजी रणवीर व वीरमाता लक्ष्मीबाइ रणवीर यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हिंगोली जिल्ह्यात उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केल्यामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांचा यांचा प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या डॉ. विजय निलावार, जयाजी पाईकराव, कुष्ठरोग निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या डॉ. मनीष बगडिया, डॉ. फैसल खान यांचा, कृषि विभागातर्फे अमोल मोर, उमाजी जुंबडे, पोलीस विभागाचे आनंद मस्के यांचा प्रशस्तीपत्र, महावितरण विभागातर्फे सौरकृषी पंप उभारणी केलेले लाभार्थी श्रीराम महाजन, अनिता बांगर, संतोष जोशी, शकुंतला गायकवाड, बापूराव पाटील यांना प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. ॲग्रीस्टॅक योजनेत हनुमान जगताप, शिवाजी जाधच, संजय जाधव, देविदास जाधव, रमेश जाधव यांना फार्मर आयडी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. उत्कृष्ठ संचलन केल्यामुळे पंडित अवचार यांचाही यावेळी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी सर्व उपस्थितांना व्यसनमुक्ती व तंबाखू मुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)