26 January, 2025

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण

हिंगोली (जिमाका), दि.26 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारतच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तहसीलदार आश्विनकुमार माने, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रशांत बिलोलीकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.राजपाल कोल्हे, तसेच सर्व अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती. *****

No comments: