03 January, 2025

गुन्हेगारी कृत्य करणारे 13 सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

• हिंगोली उपविभागीय अधिकारी यांची कार्यवाही हिंगोली (जिमाका), दि. 03 : हिंगोली उपविभागातील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या 1) भिकाजी जगन काळे रा. पारधीवाडा ता.जि.हिंगोली, 2) अभय वसंत चव्हाण रा. पारधीवाडी ता.जि.हिंगोली, 3) रविकुमार ऊर्फ कुमारा संजू काळे रा.सिध्दार्थ नगर हिंगोली जि.हिंगोली, 4) अमोल संतोष पवार रा.पारधीवाडा ता.जि.हिंगोली, 5) शंकर बाळाराम गांधी रा.तलाबकट्टा ता.जि.हिंगोली, 6) ऋषीकेश भागवत टाले रा.खुडज ता. सेनगाव जि.हिंगोली, 7) भारत हरी काळे रा.पारधीवाडा, नर्सी नामदेव ता.जि.हिंगोली, 8) शेख कदीर शेख सुलेमान रा.लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली, 9) गौरव राजू गायकवाड रा.रिसाला बाजार ता.जि.हिंगोली, 10) अनिल लक्ष्मण महाजन रा. सेनगाव ता.सेनगाव जि. हिंगोली, 11) फैझल खान रहीम खान रा.सिटी बेकरी जवळ, पूरपीडित कॉलनी, अकोट रोड, अकोला, 12) सय्यद सलमान सय्यद मुस्ताफ रा. खरबी ता.जि.हिंगोली व 13) अनिल गणपत काळे रा.खरबी ता.जि.हिंगोली अशा हिंगोली उपविभागातील हिंगोली व सेनगाव तालुक्यातील 13 सराईत गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 56 व 57 अन्वये सहा महिने व एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी समाधान घुटुकडे यांनी हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व भारतीय दंड संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हेगारी करणाऱ्या इसमाविरुध्द पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार हद्दपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील उपविभागात सार्वजनिक शांतता नांदावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नियमितपणे गुन्हेगारांविरुध्द दाखल प्रस्तावाची दखल घेऊन वेळोवेळी कडक व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे. ******

No comments: