23 January, 2025
फिरत्या दुकानाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांकडून 6 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित
हिंगोली (जिमाका), दि. 23 : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने सन 2024-25 या वर्षासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना दि. 10 जून, 2019 च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळांच्या स्तरावर सुरु आहे.
योजनेचा उद्देश : दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.
वरील योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गरजू दिव्यांग व्यक्तींनी नाव नोंदणी पोर्टलवरील https://register.mshfdc.co.in या लिंकवर जाऊन दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ (म.), हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment