16 May, 2025

इतर परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास 21 मेपर्यंत मुदतवाढ

हिंगोली (जिमाका), दि. 16 : सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र दि. 14 मेपर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 या परीक्षेचे आयोजन दि. 24 मे ते 5 जून, 2025 या कालावधीत प्रस्तावित आहे. बीएड व एमएड, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी, उमेदवारांचा परीक्षा कालावधी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी, उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025Info.aspx या लिंकद्वारे दि. 14 मेपर्यंत भरण्याबाबत सूचित केले होते. या लिंकवरील माहिती भरण्याची मुदत वाढवून आता दि. 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments: