26 May, 2025

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

हिंगोली (जिमाका), दि. 26 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थानाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने 27 मे ते दिनांक 30 मे 2025 व 2 जून ते दिनांक 5 जून 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: