02 May, 2025
मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या 8 हजार 574 लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम जमा
• उर्वरित लाभार्थ्यांनी बँक खाते आधार संलग्न करावे
हिंगोली (जिमाका), दि. 02 : 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र, इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी सन 2023-24 पासून 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगरपंचायत व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत एकत्रित 21 हजार 762 अर्ज प्राप्त झाले असून छाननीअंती 15 हजार 148 अर्जाना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत www.cmvayoshree.mahait.org या वेबसाईटवर लाभार्थीचे आवेदनपत्र शासनास ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी 8 हजार 574 लाभार्थ्यांचे बँकखाते आधार संलग्न आहेत. त्यानुसार त्यांना प्रत्येकी एकवेळ एकरक्कमी तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्यामध्ये शासनामार्फत डीबीटी प्रणालीद्वारे वितरण करण्यात आले आहेत.
तसेच वितरीत केलेल्या निधीबाबत लाभार्थ्यांनी सहाय्य साधने, उपकरणे खरेदी केलेल्या (उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इ.) साहित्य किंवा मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी डॉक्टराकंडून केलेल्या उपचार किंवा सबंधित दुकानदाराकडून खरेदी केलेल्या निधीचा उपयोग कशा प्रकारे केलेला आहे, अशा वस्तुंचे इनव्हाइस, पावती आपल्या जवळील नगर परिषद, नगर पंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावी.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील 6 हजार 571 लाभार्थ्यांनी आपल्या अर्जातील माहिती www.cmvayoshree.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन वयोश्री योजनेसाठी स्वतः अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांनी दिलेल्या लिंक वर क्लीक करून, ॲप डाउनलोड करुन आपल्या अर्जातील आधार संलग्न बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधार प्रमाणे आपले नाव इंग्रजीमध्ये अद्यावत करण्यात यावे, जेणे करुन या योजनेची रक्कम आपल्या बँकेमध्ये शासनामार्फत जमा होईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
**
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment