11 September, 2020

पेनगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

 


हिंगोली, दि.11: इसापूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात सातत्याने पर्जन्यमान होत असल्याने आज रोजी इसापूर धरण 95.65 टक्के भरले आहे. तसेच प्रकल्पाच्या वरच्या भागातील देखील धरणे भरली आहेत. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जंन्यमान झाल्यास धरण 100 टक्के भरणार आहे. आता येत्या काही दिवसात पाणलोत क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास जलाशय प्रचालन आराखड्यानुसार पेनगंगा धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. यामुळे पेनगंगा नदीला पूर येऊ शकतो.

संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ नये म्हणून पेनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांना आपली जनावरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करणेबाबत संबंधित तहसिलदार, पोलीस विभाग यांनी आपल्यास्तरावरुन सूचना द्याव्यात असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी केले आहे.

****

 

No comments: