01 August, 2021

 


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 01 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, अव्वल कारकून मिलींद श्रीपती वाकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनीही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

No comments: