06 August, 2021

 


हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या योजनेंतर्गत

महिला बचत गटांना अर्थसहाय्याचे वितरण

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 : राज्यातील महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवून स्वत:ची संकल्पना शासनाला सुचवून त्याद्वारे आर्थ‍िक भांडवल प्राप्त करावे व गटाला सक्षम करावे यासाठी हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आली .

यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण संकल्पना  सादर केलेल्या जिल्हास्तरावरील 10 महिला बचत गटाची तर तालुकास्तरावरील 50 महिला बचत गटांची निवड करण्यात आली . जिल्हास्तरावर निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास दोन लाख रुपये च्या मर्यादेत अर्थसहाय करण्याचे, तर तालुकास्तरावर निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास 50 हजार रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्याचे नियोजित होते.

हिंगोली जिल्ह्यातील निवड झालेल्या महिला बचत गटापैकी जिल्हास्तरावरचे 7 प्रकल्प अहवाल व तालुकास्तरावरचे 17 प्रकल्प अहवाल जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर निवड झालेल्या 7 महिला बचत गटांना प्रत्येकी दोन लाख रुपये व तालुकास्तरावर निवड झालेल्या 17 महिला बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाक आयुक्त प्र. सो. खंदारे यांच्या हस्ते धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आले.

याप्रसंगी महिला आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विलास जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जिल्हा अभियान व्यवस्थापक जे.व्ही. मोडके तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयातील कर्मचारी प्र. सु. रुद्रकंठवार, प्रि.ग. कनके उपस्थित होते.

*****

No comments: