14 August, 2021

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

नेहरु युवा केंद्राच्या वतीने फ्रिडम रनचे आयोजन

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 14 : भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तसेच हिंगोली जिल्ह्यातील 75 गावांमध्ये फ्रिडम रनचे आयोजन करण्यात येणार आहे.

            दिनांक 13 ऑगस्ट, 2021 पासून  ते 2 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील 75 गावांमध्ये प्रत्येक गावातील कमीत कमी 75 युवक या फ्रिडम रनमध्ये सहभागी होऊन गावकऱ्यांना आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी संदेश देणार आहेत. यासाठी प्रत्येक गावातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने फ्रिडम रनमध्ये सहभागी होऊन आपल्या गावाच्या विकासासाठी सहकार्य करावयाचे आहे.

            हिंगोली येथे दि. 18 सप्टेंबर, 2021 रोजी जिल्हास्तरीय फ्रिडम रनचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी कमीत कमी 200 युवक या रनमध्ये सहभागी होणार आहेत. या अमृत महोत्सवानिमित्त जन भागीदारी ते जन आंदोलन हे थिम ठेवून युवकांचे आरोग्य सुदृढ रहावे , त्यांनी दररोज विविध खेळामध्ये सहभाग घ्यावा आणि इतरांनाही आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जनजागृती करावी. त्याचप्रमाणे भारताला स्वांतत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले आहे याची जाणीव करुन देण्यासाठी फ्रीडम रनचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व गावातील इतर सामाजिक संस्था व युवा मंडळ, महिला मंडळ, बचत गट यांनी सहभागी होऊन अमृत महोत्सव साजरा करावयाचा आहे. यासाठी संपूर्ण गावकरी आणि युवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी आशिष पंत यांनी केले आहे.

*****

 

No comments: