03 August, 2021

 


क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 03 : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, नायब तहसिलदार डी. एस. जोशी आदींसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

No comments: