12 August, 2021

 

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंगोली दौरा

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 :  राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड ह्या दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2021 या तीन दिवसाच्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे .

शुक्रवार, दि. 13 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजता परभणी रेल्वे स्थानक येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव. 10.00 वाजता हिंगोली येथे ऑनलाईन निसर्ग शाळेचे उद्घाटन. 11.30 वाजता लक्ष्मी लाईफकेअर रुग्णालय हिंगोली येथे एमजेपीजेएवाय व पीएजेएवाय योजनेचे उद्घाटन. दुपारी 12.05 वाजता हिंगोली नगर परिषद अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती . 2.00 ते 2.30 वाजता महाविकास आघाडी कार्यकर्ते भेटी. 2.30 ते 3.00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव. 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कोविड-19, पिक विमा व पिक कर्ज, कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक. 4.30 वाजता अपंग पुनर्वसन केंद्र, हिंगोली येथे खा. राजीव सातव जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती . सांय.  5.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव .

शनिवार, दि. 14 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता कळमनुरी येथील नगर परिषद अंतर्गत रस्ता व शाळेचे बांधकाम व सुशोभिकरण कामाचे भूमीपूजन. 11.00 वाजता पंचायत समिती कळमनुरी येथे महिलांना गॅस वाटप कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 12.00 वाजता कळमनुरी येथून मोटारीने वसमतकडे प्रयाण. 1.30 वाजता माजी मंत्री तथा साखर महासंघाचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांच्या निवासस्थानी भेट. 2.00 वाजता वसमत येथे सामाजिक भवन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती . 3.30 ते 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह वसमत येथे राखीव. 4.30 वाजता वसमत येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. सांय. 5.30 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 6.30 वाजता हिंगोली येथे विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप.

रविवार, दि. 15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती . 10.00 वाजता जिल्हा परिषद, हिंगोली येथे महा आवास अभियान पुरस्कार वितरण आणि जिल्हास्तरीय शिक्षक स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम . दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे आगमन व राखीव .

*****

No comments: