10 October, 2023

 

सप्टेंबर अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र

31 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे सप्टेंबर,2023 अखेरचे ईआर-1 त्रैमासिक विवरणपत्र www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत ऑनलाईन भरावेत. माहे ऑक्टोबर, 2023 ची मासिक वेतन देयके दाखल करताना ईआर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईन प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय मासिक वेतन देयके व इतर कोणतेही देयके स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

तसेच सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,हिंगोली  या कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापूर्वीच कळविण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्व कार्यालयानी आपला        ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, टॅन क्रमांक, पॅन क्रमांक टाकून आपली प्रोफाईल अद्यावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: