05 October, 2023

 

संकल्प सप्ताहांतर्गत भिरडा येथे स्वच्छता शिबीर व स्वच्छता अभियान

 


हिंगोली, (जिमाका) दि. 05  :  आकांक्षी हिंगोली तालुक्यातील मौजे भिरडा या गावी संकल्प सप्ताह अंतर्गत स्वच्छता शिबिर स्वच्छता अभियान कार्यक्रम आज दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी घेण्यात आला आहे.

यावेळी सहायक गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील व गावातील स्वच्छता करण्यात आली.

या कार्यक्रमाला हिंगोली तालुक्याचे स्वच्छता विभागाचे श्री. आठवले, गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी वर्ग, महिला बचत गट, अशा वर्कर, अंगणवाडी ताई व गावकरी उपस्थित होते.

*****

No comments: