01 October, 2023

 

सामाजिक न्याय विभागातर्फे ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा

 


            हिंगोली (जिमाका), दि. 01 :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभांगाच्या वतीने हिंगोली येथे आज सकाळी ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सकाळी 7.30 वाजता हिंगोली शहरात वसतिगृहाचे विद्यार्थी व सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी श्रमदान करुन स्वच्छता अभियान राबविले. या कार्यक्रमाचा समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात करण्यात आला.

या ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघटना उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक अध्यक्ष अशोक तेरकर, महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कारार्थी बबनजी शिखरे, विक्रमजी जावळे  ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. एल. पोपळाईत, बाळापूर येथील शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बी. टी. कन्नावार, आर. एन. व्यवहारे, उमग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयाजीराव पाईकराव, जेष्ठ नागरिक खुर्शीद मिया पठान, सरस्वती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा ताराताई खंदारे, डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी धम्मदीप नरवाडे, सिध्दार्थ गोवंदे, श्रीकांत कोरडे, विशाल इंगोले इत्यादी उपस्थित होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त राजू एडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक इंगोले यांनी केले. 

            या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनी कु.प्रेरणा राहुल ढेंबरे व कु.संध्या लिंबाजी हातागळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या विषयावर गीत गायन केले.

            यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रादेशिक अध्यक्ष अशोक तेरकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या व्यथा व वृध्दापकाळात जीवन कसे जगावे यावर सखोल मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोपामध्ये सहायक आयुक्त राजू एडके यांनी ज्येष्ठ नागरिकासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रं. 14567 सुरु असल्याचे उपस्थितांना अवगत करुन देऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ज्येष्ठ नागरिकांचे अडचणीसाठी सदैव तत्पर असल्याचे मनोगत व्यक्त केले.

            यावेळी उपस्थित 200 ते 250 ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालय, हिंगोली यांचे आरोग्य पथकाने आरोग्य तपासणी व दंत तपासणी करण्यात आली.

            कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सर्व कर्मचारी वृंद यांनी अनमोल सहकार्य केले.

********

 

No comments: