04 October, 2023

 आंकाक्षीत तालुका अंतर्गत सर्व अंगणवाड्यामध्ये पोषण मेळावे

 




 

हिंगोली, (जिमाका) दि. 04  :  आकांक्षीत तालुका अंतर्गत  हिंगोली तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दि. 4 ऑक्टोबर, 2023 रोजी मेळावे घेण्यात आले.

या पोषण मेळाव्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, बाल विकास प्रकलप अधिकारी  आर. आर. मगर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, सहायक गटविकास अधिकारी विष्णू भोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुक्यातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण मेळावे घेण्यात आले.  

या पोषण मेळाव्यामध्ये अंगणवाडीतील बालकांचे वजन उंची घेणे, गरोदर मातांचे वजन घेणे, गोदभराई कार्यक्रम घेणे, अन्नप्राशन कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. तसेच गरोदर मातांना बालकांची कशा प्रकारे काळजी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संतुलित आहार कशा प्रकारे घेण्यात यावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

******* 

No comments: