16 October, 2023

 विकसित राष्ट्रासाठी माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

·         जिल्ह्यातील पाचही नगर पालिका व नगर पंचायतीचे अमृत कलश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सुपूर्द




 

हिंगोली (जिमाका), दि. 16 :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांअंतर्गत  मिट्टी को नमन, वीरो को वंदन करण्यासाठीमेरी मिट्टी मेरा देशअभियान संपूर्ण देशात हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. मेरी माती मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अंतर्गत कलश यात्रा काढून देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने व आपले हक्क आणि अधिकार, कर्तव्याची अंमलबजावणी आणि आपल्या देशावर, मातीवर प्रेम करावे या उद्देशाने हा उपक्रम देशातील सर्व नगरपालिका क्षेत्रातून, गावागावातून राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. 

 जिल्ह्यातील पाचही नगरपालिका व नगर पंचायतीने संकलित केलेली माती अमृत कलशाची आज जिल्हाधिकारी कार्यालय ते गांधी चौक व परत जिल्हाधिकारी कार्यालय अशी रथ यात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालय येथे अमृत कलश यात्रेचा समारोप करण्यात करण्यात आले. संकलित केलेली माती एका कलशा मध्ये टाकून पाचही नगर पालिका व नगर पंचायतीचे अमृत कलश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा प्रशासन अधिकारी अनंत जवादवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ‘मेरी माटी, मेरा देश अर्थात माझी माती, माझा देश’ अभियान अंतर्गत जिल्ह्यातील माती दिल्ली येथे अमृत वाटिका निर्मितीसाठी वापरली जाणार आहे.

जिल्ह्यातील पाचही नगरपालिका व नगर पंचायतीचे अमृत कलश हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तसेच औंढा नगर पंचायतचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, वसमत आणि कळमनुरी नगर परिषद मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, सेनगाव नगर पंचायतचे मुख्याधिकारी जोशी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. हे अमृत कलश हिंगोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे व अंकुश जाधव हे दिल्लीला घेऊन जाणार आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांअंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन,वीरो को वंदन हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पाचही नगर परिषद व नगर पंचायतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश हा प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी. या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरविरांचा सन्मान व्हावा यासाठी या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

यामध्ये जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी नगर परिषद आणि औंढा नागनाथ व सेनगाव येथील नगर पंचायतीने आझादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमअंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही अमृत कलश यात्रा संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून वार्डा-वार्डात जाऊन घराघरातील माती अथवा तांदूळ संकलित करीत होती. या उपक्रमाचा उद्देश असा की प्रत्येक नागरिकाच्या मनात आपल्या माती विषयी व देशाबद्दल प्रेम उत्पन्न व्हावे, आपली संस्कृती जोपासली जावी, गुलामगिरीची मानसिकता नष्ट व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हिंगोली शहरातील संपूर्ण 16 वार्डामधून कलश यात्रा काढून नागरिकांमार्फत माती व तांदूळ कलशा मध्ये टाकून मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आले होते. ही अमृत कलश यात्रा दि. 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2023 पर्यंत हिंगोली शहरात सुरु होती. यामध्ये संपूर्ण हिंगोली शहरातील नागरिकाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपला सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव नगर परिषद आणि नगर पंचायत यांनी सुद्धा अमृत कलश यात्रा काढली होती.

यावेळी संकलित केलेली उर्वरित माती ही नगर परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या वसुधा वंदन अमृत वाटिकेतील वृक्षांना अर्पित करण्यात आली. यावेळी उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, कार्यालयीन अधीक्षक देविसिंघ ठाकूर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, आशिष रणसिंगे, गजानन कदम, संतोष मेंडके यांच्यासह हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव येथील नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

******

No comments: