09 October, 2023

 

आकांक्षीत तालुका अंतर्गत उमेद मार्फत

संकल्प सप्ताह समृद्धी दिवस अजीविका मेला झाला साजरा

 

 


हिंगोली, (जिमाका) दि. 09  :  आकांक्षीत तालुका हिंगोली अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, सहायक गट विकास अधिकारी विष्णू भोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 8 ऑक्टोबर, 2023 रोजी आकांक्षित तालुका अंतर्गत उमेद अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत  संकल्प सप्ताह अंतर्गत अजीविका मेला व  समृद्ध दिवस  तालुक्यातील कार्यरत ग्रामसंघ पातळीवर व तालुकास्तरावर  साजरा करण्यात आला.

नीती आयोगामार्फत निवड करण्यात आलेल्या आकांक्षीत तालुका अंतर्गत अजिविका उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, हिंगोली अंतर्गत संकल्प सप्ताह समृद्ध दिवस अजिविका मेळावा घेऊन  साजरा करण्यात आला. यासाठी जिल्हा व्यवस्थापक तथा तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे, जिल्हा व्यवस्थापक राम मेकाले, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, उज्वला गायकवाड, प्रभाग समन्वयक दिनकर तपासे, गजानन लोखंडे, अरविंद धाबे, दैवता चाटसे व तालुक्यातील 120 समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते.

या कार्यक्रमांमध्ये राजू दांडगे यांनी  उमेद अभियान अंतर्गत दिलेल्या विषयांमध्ये राज्याच्या तुलनेमध्ये प्रगती करण्याच्या अनुषंगाने सामाजिक समावेशन गट बांधणी फिरता निधी समुदाय गुंतवणूक निधी,  एम.आय.पी. ग्रामसंघ बांधणी तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षणे विहित वेळेत घेऊन प्रगती करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच केंद्र शासनामार्फत चालू करण्यात आलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना यामध्ये 18 प्रकारची कौशल्य असणारी कारागीर यांना कौशल्यवर्धक प्रशिक्षणे, त्या अनुषंगाने शासनाचे मिळणारे लाभ, त्या योजनेचे लाभ घेण्यासाठी नियम, अटी व पात्रता यासाठी लागणारी कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया याबाबतची संपूर्ण माहिती देऊन उमेद अभियानाअंतर्गत आलेल्या कुटुंबाची व गावातील कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची जास्तीत जास्त नोंदणी करण्याबाबत सर्वांना माहिती दिली. तसेच राम मेकाले यांनी डिजिटल मार्केटिंग व ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण बाबी व ऑनलाईन मार्केटिंग, तसेच तालुका व जिल्हास्तरावर स्टॉल लावण्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सिद्धार्थ पंडित यांनी वित्तीय साक्षरताची आवश्यकता व गरज या अनुषंगाने संपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच उज्वला गायकवाड यांनी अभियान अंतर्गत सर्व इंडिकेटर मध्ये प्रगती करण्यासाठी सर्वांनी मनोभावे काम करुन प्रगती करण्याबाबत मत व्यक्त केले.

            या संकल्प सप्ताह अंतर्गत आजीविका मेळावा व समृद्ध दिवस  यशस्वी करण्यासाठी राजू दांडगे, सिद्धार्थ पंडित, उज्वला गायकवाड, गजानन लोखंडे, अरविंद जाधव, दैवता चाटसे, सर्व समुदाय संसाधन व्यक्ती  यांनी परिश्रम घेतले.

 

*****

No comments: